मुंबई: ठाणे महानगरपालि्केच्या(TMC) कळवा (kalwa) येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील रुग्णांच्या मृत्यूंचे सत्र काही केल्या संपत नाहीये. त्यातच सोमवारी चार रुग्ण (patient) दगावले. धक्कादायक या रुग्णांमध्ये एका एक महिन्याच्या बाळाचा समावेश आहे. या शासकीय रुग्णालयात गेल्या चोवीस तासात १८ जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर सोमवारी ही घटना घडली.
रात्री बारा वाजल्यापासून या रुग्णालयात चार रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून मिळाली आहे. यामध्ये सगळ्यात वेदनादायी म्हणजे नुकतेच या जगात आलेले असे केवळ एक महिन्याचे बाळ आहे. दरम्यान, कळवा रुग्णालयाती या मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते.
याआधी याच रुग्णालयात रविवारी १८ रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. यामुळे प्रचंड खळबळ उडाली होती. वाढत्या रुग्णसंख्येमुळे तेथील कर्मचाऱ्यांवर प्रचंड ताण आहे. या १८ झालेल्या मृत्यूंपैकी १३ रुग्ण हे आयसीयूमधील तसेच ४ रुग्ण हे जनरल वॉर्डमधील होते. तसेच याआधी एकाच दिवशी या रुग्णालयात पाच जणांचा मृत्यू झाला होता.
दरम्यान, कळवा येथील मृत्यू प्रकरणावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रचंड आक्रमक झाली आहे. त्यांनी यावेळे मनपा आयुक्तांच्या कार्यालयाबाहेर ठिय्या मांडत आंदोलन केले. यावेळी मनसेकडून जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. तसेच या घटनेची जबाबदारी आयुक्तांनी घ्यावी अशी मागणी
गुरुनाथ तेंडुलकर या प्रश्नाचं बाळबोध उत्तर-काहीतरी साध्य करण्यासाठी लागणारं सामान म्हणजे साहित्य. बागेत फुलझाडं लावायची…
भालचंद्र ठोंबरे शुरसेन देशात चित्रकेतू नावाचा एक चक्रवर्ती राजा होता. तो अतिशय धार्मिक, सुंदर, सर्वगुणसंपन्न…
अॅड. रिया करंजकर कायदेशीर कामकाज करताना प्रत्येक वेळी स्टॅम्प पेपरची गरज भासते. हे स्टॅम्प पेपर…
राजश्री वटे मानवी जीवनात महत्त्वाची भूमिका असते पुस्तकाची... म्हणतात ना “वाचाल तर वाचाल’’... लहानपणापासून ते…
प्रा. देवबा पाटील आनंदराव हे सेवानिवृत्त वैज्ञानिक असल्याने त्यांना विज्ञानाच्या सर्वच गोष्टी माहीत होत्या. ते…