‘सुभेदार’ चित्रपटाच्या ट्रेलरला लाखोंची पसंती 

‘आधी लगीन कोंढाण्याचं आन मग माझ्या रायबाचं’                                                      स्वराज्यासाठी तळहातावर शीर घेऊन लढणाऱ्या योद्ध्यांच्या अतुलनीय शौर्याने शिवकालीन इतिहास झळाळून उठला आहे. अशा अनेक शूरवीर योद्ध्यांनी आपल्या कर्तृत्वाने भारतीयांना प्रेरित केले आहे. ‘सुभेदार तान्हाजी मालुसरे’ हे नाव घेतलं की, आपल्याला आठवतो तो ‘कोंढाण्याचा सिंहपराक्रम’. ‘आधी लगीन कोंढाण्याचं आन मग माझ्या रायबाचं’ म्हणत कोंढाण्यावर चढाई करणाऱ्या सुभेदार तान्हाजी मालुसरे यांचे नाव इतिहासात सुवर्णअक्षरांनी लिहिले गेले आहे. हाच सुवर्ण इतिहास १८ ऑगस्टला ‘सुभेदार’ या भव्य चित्रपटातून रूपेरी पडद्यावर उलगडला जाणार आहे. तत्पूर्वी चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला असून अल्पावधीतच या ट्रेलरने १ मिलियनचा टप्पा पार केलाय. अतिशय वेगवान पद्धतीने ट्रेलरला लाखोंची पसंती मिळाली आहे.


‘अखेर निसटे शिवहस्तांतुनि तीरचि तान्हाजी प्रेमे आजी सिंहगडाचा पोवाडा गाजी...’ या शब्दांतून आणि ट्रेलरमधून सुभेदार तान्हाजी मालुसरे म्हणजे निष्ठा, त्याग, समर्पण याचे मूर्तिमंत उदाहरण ही ओळख पटते. काही तासांत या ट्रेलरने कमाल केली आहे. या ट्रेलरचे हिट्स सातत्याने वाढत असून प्रेक्षकांच्या पसंतीची पावती ट्रेलरला मिळाली आहे. सुभेदार तान्हाजी मालुसरे यांचे कल्याणकारी जीवनकार्य तसेच स्वराज्यासाठीच्या बलिदानाची तेजस्वी यशोगाथा मांडणाऱ्या दिग्पाल लांजेकर लिखित-दिग्दर्शित ‘सुभेदार’ चित्रपटाद्वारे आपल्याला पुन्हा एकदा इतिहासाचे साक्षीदार होण्याची संधी मिळणार आहे. मृणाल कुलकर्णी, चिन्मय मांडलेकर, अजय पुरकर, समीर धर्माधिकारी, अभिजीत श्वेतचंद्र, स्मिता शेवाळे, उमा सरदेशमुख, अर्णव पेंढारकर, शिवानी रांगोळे,नूपुर दैठणकर, भूषण शिवतरे, श्रीकांत प्रभाकर, बिपीन सुर्वे, अलका कुबल, राजदत्त, ऐश्वर्या शिधये, सौमित्र पोटे, संकेत ओक, सुनील जाधव, मंदार परळीकर, विराजस कुलकर्णी, अजिंक्य ननावरे, दिग्विजय रोहिदास, रिषी सक्सेना, ज्ञानेश वाडेकर, मृण्मयी देशपांडे, दिग्पाल लांजेकर, आस्ताद काळे, पूर्णानंद वाडेकर आदी मराठीतील अनेक दिग्गज कलाकार या चित्रपटामध्ये आहेत. सुभेदार तान्हाजी मालुसरे यांच्या असीम शौर्याची गाथा उलगडणारा ‘सुभेदार’ चित्रपट १८ ऑगस्टला आपल्या भेटीला येतोय.


कुटुंब रंगलंय चित्रपटात
काही कुटुंब व्यवसायात, तर काही कलेत एकत्र रमतात. प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, त्यांचा अभिनेता पुत्र अभिनेता विराजस कुलकर्णी आणि त्याची पत्नी अभिनेत्री शिवानी रांगोळे हे तिघंही पहिल्यांदाच आगामी ‘सुभेदार’ या चित्रपटात एकत्र काम दिसणार आहेत. ‘सुभेदार’ या आगामी चित्रपटात मृणाल कुलकर्णी जिजाऊ आईसाहेबांच्या, विराजस जीवाच्या भूमिकेत पाहायला मिळणार असून यशोदाबाई मालुसरेच्या भूमिकेत शिवानी रांगोळे दिसणार आहे. आपल्या आजोबांकडून मिळालेला इतिहासाचा वारसा जपत मृणाल कुलकर्णी यांनी वेगवेगळ्या ऐतिहसिक भूमिकांमधून आपला ठसा उमटवला आहे. ‘सुभेदार’ या चित्रपटात तान्हाजी मालुसरे यांना कुटुंबाने कशी मोलाची साथ दिली हे पाहायला मिळणार असून या चित्रपटाच्या निमित्ताने आमचं कुटुंबही एकत्र आल्याचा आनंद वेगळा असल्याचं मृणाल कुलकर्णी सांगतात.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra.
Comments
Add Comment

Bigg Boss Marathi Season 6: पहिल्याच 'भाऊच्या धक्क्या"वर रितेश देशमुख घेणार तन्वी आणि रुचितासोबत इतर सदस्यांची शाळा!

"तन्वी तुम्ही आहात या घराच्या तंटा क्वीन!" - रितेश देशमुख "रुचिता जामदार महाराष्ट्राने पहिल्यांदाच स्वतःला पंजा

आठवणीतला गोडवा

राज चिंचणकर, राजरंग मकरसंक्रांती आणि गोडवा, हे समीकरण अतूट आहे. संक्रांतीपासून रथसप्तमीच्या दिवसापर्यंत सुरू

हे नाटक चालू शकतं? लागली पैज...

भालचंद्र कुबल, पाचवा वेद आमच्या पिढीला, करीअर करायला निघालेल्या नवरा बायकोमध्ये वितुष्ट आले की पहिल्यांदा

PIFF : 'थर्ड आय एशियन'नंतर 'गमन' आता 'पिफ'मध्ये, पाहायला मिळणार स्थलांतराचा अनोखा अनुभव

मुंबई : स्थलांतराचा अनुभव आपल्या सगळांच्या आयुष्यात एकदा तरी येतोच येतो पण हा केवळ एक अनुभव नसून त्यावेळी

Disha Patani and Talwinder: बॅालिवुड अभीनेत्री पंजाबी सिंगर तलविंदरला करते डेट? नक्की काय आहे विषय..

Disha Patani and Talwinder: बॉलिवूडमधील सर्वात फिट आणि ग्लॅमरस अभिनेत्रींमध्ये दिशा पाटनीचे नाव कायमच आघाडीवर असते. तिची टोन्ड

Big Boss Marathi : कठीण परिस्थितीची आठवण आजही मनात; करण सोनावणे म्हणतो, ‘त्या अनुभवांनी मला घडवलं’

मुंबई : बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वाने पहिल्याच आठवड्यात प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं असून, घरातील