
काय आहे हे ट्विट?
नवी दिल्ली : स्वातंत्र्याची ७५ वर्षे साजरी करताना (75 years of Independence) भारताचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी देशात 'हर घर तिरंगा' (Har ghar Tiranga) ही मोहिम सुरु केली होती. या मोहिमेमुळे गेल्या वर्षीच्या स्वातंत्र्यदिनादिवशी (Independence Day) प्रत्येक घराच्या खिडकीत एक तिरंगा फडकताना दिसत होता. भारतासाठी अभिमानास्पद असे ते चित्र होते. मात्र केवळ एकच वर्ष ही मोहिम न राबवता यंदाच्या वर्षीही 'हर घर तिरंगा' दिसावा असा पंतप्रधान मोदींचा मानस आहे. यंदाच्या ७६ व्या स्वातंत्र्यदिनादिवशी पुन्हा एकदा 'हर घर तिरंगा' मोहीम राबवण्याची तयारी सुरू आहे. याबाबतची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरून दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन दोन ट्विट्स केली आहेत. या ट्विट्समध्ये ते म्हणतात, तिरंगा स्वातंत्र्य आणि राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक आहे. प्रत्येक भारतीयाचा तिरंग्याशी भावनिक संबंध आहे आणि तो आपल्याला पुढे राष्ट्रीय प्रगतीसाठी कठोर परिश्रम करण्याची प्रेरणा देतो. मी तुम्हा सर्वांना विनंती करतो की १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान हर घर तिरंगा मोहिमेत सहभागी व्हा. 'हर घर तिरंगा' मोहिमेने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात नवी ऊर्जा भरली आहे. देशवासियांना यंदा ही मोहीम एका नव्या उंचीवर न्यायची आहे. १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान देशाच्या अभिमानाचे आणि अभिमानाचे प्रतीक असलेला राष्ट्रध्वज फडकावू या. तुमचा तिरंग्यासोबतचा सेल्फी https://harghartiranga.com वर अपलोड करा, असे आवाहन पंतप्रधानांनी आपल्या ट्विटद्वारे केले आहे.
‘हर घर तिरंगा’ अभियान ने आजादी के अमृत महोत्सव में एक नई ऊर्जा भरी है। देशवासियों को इस साल इस अभियान को एक नई ऊंचाई पर ले जाना है। आइए, 13 से 15 अगस्त के बीच देश की आन-बान और शान के प्रतीक राष्ट्रीय ध्वज को फहराएं। तिरंगे के साथ https://t.co/0CtV8SCePz पर अपनी सेल्फी भी जरूर…
— Narendra Modi (@narendramodi) August 11, 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 'हर घर तिरंगा' मोहिमेची सुरुवात केली होती. गेल्या वर्षी या मोहिमेमुळे सुमारे ५०० कोटींचे तिरंगे खरेदी करत लोकांनी विक्रमी तिरंगा फडकवण्याचे काम केले होते. म्हणजेच, एका निर्णयाने लोकांवर अशा प्रकारे प्रभाव टाकला की दुकानांवर झेंड्यांची कमतरता होती, पण लोक तिरंगा खरेदी करत राहिले. आता पुन्हा एकदा असेच आवाहन करण्यात आले आहे. यावेळी किती तिरंगा फडकवतात, किती विक्रम होतात याकडे सर्वांचे लक्ष असेल.
The Tiranga symbolises the spirit of freedom and national unity. Every Indian has an emotional connect with the Tricolour and it inspires us to work harder to further national progress. I urge you all to take part in the #HarGharTiranga movement between 13th to 15th August.…
— Narendra Modi (@narendramodi) August 11, 2023