मुंबई : दर्जेदार मालिकांमुळे स्टार प्रवाह वाहिनी (Star Pravah) लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली आहे. ‘आपली मराठी परंपरा, मराठी प्रवाह’ अशी टॅगलाईन आता प्रत्येक घरातून ऐकू येऊ लागली आहे. याच स्टार प्रवाह वाहिनीने आता ‘वेड’ (Ved movie) चित्रपटाच्या माध्यमातून एक नवा विक्रम रचला आहे. २० ऑगस्टला सायंकाळी ७ वाजता ब्लॉकबस्टर वेड चित्रपटाचा स्टार प्रवाहवर वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमिअर (World Television Premier) होणार आहे. याच निमित्ताने सुपरस्टार रितेश देशमुख (Ritesh Deshmukh) यांच्या उपस्थितीत हा अनोखा विक्रम रचण्यात आला.
वेड चित्रपटातील सत्या आणि श्रावणी या मुख्य पात्रांनी प्रेक्षकांना वेडं करुन सोडलं आहे. केवळ गाणीच नाही तर चित्रपटाची कथाही प्रेक्षकांना तितकीच आवडली. यातील मुख्य जोडप्याचं छत्रीसोबत एक विशेष नातं आहे. याच गोष्टीमुळे प्रेमाची साक्ष देणाऱ्या भव्यदिव्य हृदयाची कलाकृती छत्र्यांच्या साहाय्याने साकारून जागतिक विक्रम रचण्यात आला. मराठी सिनेमा आणि मराठी वाहिन्यांच्या इतिहासात पहिल्यांदाच हा प्रयोग करण्यात आला आहे. ही भव्यदिव्य कलाकृती साकारण्यासाठी तब्बल १ हजार ४४६ छत्र्यांचा वापर करण्यात आला. या प्रत्येक छत्रीवर स्टार प्रवाहचा लोगो छापण्यात आला होता. दोन दिवसांच्या अथक परिश्रमानंतर ही कलाकृती आकारास आली. रितेश देशमुख यांनी या कलाकृतीतील अखेरची छत्री स्वहस्ते ठेऊन गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड (Guinness World Record ) पूर्णत्वास नेला.
स्टार प्रवाह वाहिनीने दिलेल्या या मौल्यवान क्षणांबद्दल मी आणि जेनेलिया आभारी आहोत अशा शब्दांत रितेश देशमुख यांनी भावना व्यक्त केली. तर स्टार प्रवाहचे बिझनेस हेड सतीश राजवाडे (Satish Rajwade) म्हणाले, ‘मराठी सिनेमा हा प्रत्येक मराठी प्रेक्षकांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. वेड सिनेमाने प्रेक्षकांना खरंच वेड लावून दमदार कमाई केली ही या सिनेमाची ताकद आहे. स्टार प्रवाह वाहिनी मराठी परंपरा राखण्याचा कायम प्रयत्न करते आणि म्हणूनच स्टार प्रवाह या महाराष्ट्राच्या नंबर वन वाहिनीवर महाराष्ट्राचा नंबर वन सिनेमा २० ऑगस्टला घेऊन येतोय. या सिनेमासाठी गिनिज वर्ल्ड रेकॉर्डस रचत स्टार प्रवाह याअग्रगण्य वाहिनीने जगाच्या नकाशावर नाव कोरलं आहे.’
'शिट्टी वाजली रे' ला टक्कर द्यायला आला नवीन शो मुंबई: सध्या मराठी वाहिन्यांवर नवनवीन मालिका…
मुंबई: अनेकांना आपलं आरोग्य कसं आहे, आणि आपण किती वर्ष जगणार हे जाणून घेण्यासाठी अनेकजण…
सध्या आयपीएलचा सीझन रंगात आला आहे. संध्याकाळी साडेसात वाजल्यापासून क्रिकेटप्रेमी टीव्ही किंवा मोबाईलसमोर ठाण मांडून…
उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सोमशेखर सुंदरसन यांचे मत मुंबई : कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence – AI)…
मुंबई : शिक्षकांसाठी ड्रेसकोड ठरवण्याचा प्रस्ताव शालेय शिक्षण विभागाकडून पुन्हा एकदा विचाराधीन आहे. प्रत्येक जिल्ह्याला…
काही दिवसांपूर्वी २६/११ चा मुंबई दहशतवादी हल्ल्याचा आरोपी तहव्वूर राणा याचं भारतात प्रत्यार्पण झालं. त्यानंतर…