Cluster Meetings of BJP : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान घेणार खासदारांची झाडाझडती

मिशन फत्ते करण्यासाठी भाजप कंबर कसून कामाला...


नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Elections) दृष्टीने सर्वच पक्षांची जोरदार तयारी सुरु झाली आहे. भाजप पक्ष (BJP) तर यासाठी कंबर कसून कामाला लागला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह (PM Narendra Modi) भाजपाचे लक्ष महाराष्ट्र (Maharashtra), गोवा (Goa) अशा कमी प्रभाव असलेल्या राज्यांकडे लागले आहे. त्याच दृष्टीने पंतप्रधानांनी महाराष्ट्रातील एनडीए (NDA) खासदारांची थेट दिल्लीमध्ये (Delhi) बैठक बोलावली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी पंतप्रधान क्लस्टर बैठका (Cluster meetings) घेत आहेत, त्यापैकीच ही एक बैठक असणार आहे.


आज महाराष्ट्र आणि गोव्यातील ४८ खासदारांची सायंकाळी ६ वाजता दिल्लीतील नवीन महाराष्ट्र सदनात एकत्रित बैठक होणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah), मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari), मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Sinha) बैठकीला उपस्थित राहणार आहेत. भाजपने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात मिशन ४५ चा नारा दिला आहे. या निवडणुकीत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची शिवसेना, तसेच अजित पवारांची (Ajit Pawar) राष्ट्रवादी काँग्रेस देखील भाजपसोबत असेल.



आजच्या बैठकीत काय रणनिती?


भाजप प्रत्येक राज्यासाठी वेगळे नियोजन करत आहे. पंतप्रधान घेत असलेल्या या क्लस्टर बैठकांपैकी आजच्या बैठकीत महाराष्ट्र आणि गोव्यासाठी नेमकी काय रणनिती आखली जाणार, हे पाहणं महत्त्त्वाचं ठरणार आहे. आजच्या बैठकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार देखील सहभागी होणार आहेत.



सर्व ४३० खासदारांना भेटणार


नरेंद्र मोदी एनडीएच्या लोकसभा आणि राज्यसभेच्या सर्व ४३० खासदारांना भेटणार आहेत. नरेंद्र मोदी विविध गटातील सर्व खासदारांना भेटणार आहेत. ते पश्चिम बंगाल, झारखंड आणि ओडिशाच्या खासदारांनाही भेटणार आहेत. यामध्ये गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे देखील सहभागी होणार आहेत.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra
Comments
Add Comment

जीएसटी कपातीमुळे भारतात नवरात्रीमध्ये १० वर्षांत सर्वाधिक विक्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): मोदी सरकारच्या नेक्स्ट जेन जी. एस. टी. सुधारणांमुळे केवळ करांचे दर कमी झाले नाहीत तर

तरुणांसाठी ६२,००० कोटी रुपयांची मोठी योजना; मोदी आज करणार सुरू

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशातील तरुणांना कौशल्ये, शिक्षण आणि रोजगार (Skilling, education, and employment) देण्यासाठी अनेक

सावधान! भारतात ५० लाखांहून अधिक लोकांना चिकनगुनियाचा मोठा धोका

नवी दिल्ली: डासांमुळे होणाऱ्या चिकनगुनिया नावाच्या एका व्हायरल आजाराने भारतात सुमारे ५१ लाख (५.१ दशलक्ष) लोकांना

१,२०० कोटींच्या गोवा जमीन घोटाळ्यात शिवशंकर मायेकरला ED कडून अटक

नवी दिल्ली: सक्तवसुली संचालनालयाने (ED) आज सांगितले की, यशवंत सावंत आणि इतरांशी संबंधित असलेल्या जमीन

दहशतवाद्यांचा 'धर्म' नाही, आम्ही दहशतवादाला मारलं: राजनाथ सिंह यांचा सर्जिकल स्ट्राईकवर जोर

नवी दिल्ली: संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज २०१६ चा सर्जिकल स्ट्राईक, २०१९ चा बालाकोट हवाई हल्ला आणि ऑपरेशन

अरबी समुद्रात धडकणार शक्ती चक्रीवादळ, सतर्कतेचा इशारा

मुंबई : अरबी समुद्रात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्राने आता वादळाचे रूप धारण केले आहे. येत्या २४ तासात हे