मुंबई : उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी काल एका भाषणात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा मास्टर नव्हे तर ‘मस्टर मंत्री’ असा उल्लेख केला. भाजपामध्ये आता राम उरला नाही, केवळ आयाराम आहेत, असंही ते म्हणाले. यावर भाजप नेत्यांकडून जोरदार हल्लबोल करण्यात येत आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी देवेंद्रजींच्याच मास्टर स्ट्रोकमुळे तुम्हाला घरी बसावं लागलं’, असा टोला लगावला आहे. तसेच बाळासाहेबांची शिवसेना तुम्ही काँग्रेसच्या दावणीला बांधली, असा आरोप उद्धव ठाकरेंवर केला आहे.
ज्यांना वडिलांनी स्थापन केलेला पक्ष टिकवता आला नाही ते उद्धव ठाकरे म्हणत आहेत की, भाजपमध्ये राम उरला नाही. तुम्ही सत्तेसाठी हिंदुत्व गुंडाळून ठेवलं. आता प्रभू श्रीरामचंद्रांची तुम्हाला आठवण येत आहे. राम मंदिराचं भूमीपूजन झालं तेव्हा जल्लोष करणाऱ्या रामभक्तांवर तुमच्या सरकारनं राज्यभर गुन्हे दाखल केले होते हे तुम्ही विसरलात की काय?, असा सवाल चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.
औरंग्याच्या प्रवृत्तीसोबत कोण बसलं आहे, हे महाराष्ट्रातील जनतेनं पाहिलं आहे. औरंग्याच्या सत्तेला जसा छत्रपती शिवरायांनी सुरुंग लावला, तसाच सुरूंग जनतेनं तुमच्या सत्तेला लावला. २०२४ सालीही जनता पुन्हा एकदा बाळासाहेबांच्या हिंदुत्ववादी विचारांच्या शिवसेनेला आणि भाजपला निवडून देईल. तोवर तुम्ही औरंग्या, अफझल खान आणि इंग्रजांचा उदो उदो करत बसा कारण लोकांनी तुम्हाला सध्या तेवढंच काम दिलंय, अशी खोचक टीका बावनकुळेंनी केली.
चंद्रशेखर बावनकुळे यांनीही ट्विट करून उद्धव ठाकरे यांच्या टीकेचा समाचार घेतला आहे. ते म्हणाले, तुम्ही बाळासाहेबांची शिवसेना काँग्रेसच्या दावणीला बांधून ठेवली होती. जी प्रामाणिक शिवसैनिकानं मुक्त केली आणि बाळासाहेबांचा भगवा झेंडा पुन्हा अभिमानाने महाराष्ट्रावर फडकला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्याची तुमची लायकी नाही हे अनेकदा तुम्हीच सिद्ध केले आहे. देवेंद्रजी मस्टर मंत्री नाही तर मास्टर आहेत. त्यांच्या मास्टरस्ट्रोकमुळेच तुम्हाला घरी बसावं लागलं असा टोला बावनकुळेंनी लगावला आहे.
मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…
मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…
मुंबई : ग्रामीण असो किंवा शहरी भाग, लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये. उन्हाळा…
इंडिया कॉलिंग : डॉ. सुकृत खांडेकर महाराष्ट्रात यापुढे पहिलीपासून हिंदी भाषा शिकवणे अनिवार्य होणार आहे.…
श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटक आणि स्थानिकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात २७ व्यक्तींचा…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात टक्कर…