नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रोड सेफ्टी टी-२० लीगचा तिसरा मोसम सप्टेंबरमध्ये खेळला जाणार आहे. या स्पर्धेनिमित्त मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग, युवराज सिंग, ब्रायन लारा, ब्रेट ली या माजी दिग्गज खेळाडूंचा खेळ पहायला मिळणार आहे.
गेल्या वर्षी झालेल्या या मालिकेत जगभरातील दिग्गजांच्या आठ संघांचा समावेश करण्यात आला होता. त्यात ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, भारत, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि वेस्ट इंडिज या संघांचा समावेश आहे. यंदा पाकिस्तानचा संघही यात पहिल्यांदाच सहभागी होण्यासाठी सज्ज झाला आहे.
या वर्षी सप्टेंबरमध्ये रोड सेफ्टी टी-२० लीगचा तिसरा मोसम खेळला जाणार आहे. ही लीग आतापर्यंत भारतात खेळवली गेली आहे, परंतु आगामी हंगाम इंग्लंडमध्ये होणार असल्याचे समजते. दोन वर्षांपूर्वी मार्च २०२० मध्ये लीग सुरू झाली. आतापर्यंत त्याचे दोन सीझन खेळले गेले आहेत. हे दोन्ही हंगाम भारतात खेळले गेले. तिसरा हंगाम सप्टेंबरमध्ये खेळला जाईल. लीगच्या आगामी आवृत्तीत, गेल्या वर्षीच्या तुलनेत ९ संघ सहभागी होणार आहेत.
Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra