- क्राइम : ॲड. रिया करंजकर
सुधीरने रूमचे मालक वेगळे दाखवून ॲग्रीमेंट केली होती अन्य त्या रूमचे खरोखर वेगळेच कुणी मालक होते. सुधीर याने आपली फसवणूक केलेली आहे, याची जाणीव आता महिंद्राला झाली.
महिंद्र हा एजंट होता आणि छोटे-मोठे रूम भाड्याने देणे आणि विकणे हा व्यवसाय तो करत होता. त्यामुळे थोडीफार त्याची म्हाडामध्ये ओळख झालेली होती. म्हाडामध्ये कोणाला रूम घ्यायचा असेल, तर तो रूम घेण्यासाठीचा व्यवहार करण्यासाठी मध्यस्थ म्हणून काम करत होता व त्यासाठी त्याला दलाली मिळत होती. या दलालीच्या व्यवसायामध्ये त्याची आर्थिक परिस्थिती सुधारलेली होती. या व्यवसायामुळे त्याच्या अनेक ओळखी वाढलेल्या होत्या. असाच एक दिवस त्याची ओळखीची व्यक्ती सुधीर असं बोलला की, म्हाडाचा रूम त्याच्या नातेवाइकाचा हेवी डिपॉझिटवर भाड्याने द्यायचे आहे जर कोणी डिपॉझिट असेल, तर त्याने हा व्यवहार करावा. महिंद्रलाही वाटलं की, हेवी डिपॉझिटवर जरूर दिला भाड्याने, तर चांगल्याच प्रकारे त्याच्या दलाली मिळेल. त्यामुळे तो हेवी डिपॉझिट देणारे भाडोत्री शोधू लागला आणि दलाल असल्यामुळे त्याला हेवी डिपॉझिटवर भाडोत्री मिळाला. चार लाख रुपये घेऊन तो रूम हेवी डिपॉझिटवर देण्यात आला. त्यामध्ये महिंद्रालाही चांगले पैसे मिळाले. परत सुधीर महिंद्रकडे आला आणि अशाच त्याच्या दहा-बारा नातेवाइकांचे भाड्यामध्ये रूम आहेत ते त्यांना हेवी डिपॉझिटवर द्यायचे आहेत, कारण ते मुंबई शहरात न राहता गावाकडे राहत असल्यामुळे त्यांना सतत भाडे घ्यायला मुंबईत येता येणार नाही. म्हणून हेवी डिपॉझिटवर द्यायचे आहेत, असं सुधीर महिंद्राला बोलला. त्यामुळे हेवी डिपॉझिटवर कोण भाडोत्री असतील, तर शोध, असं सुधीरने महिंद्रला सांगितलं.
महेंद्रलाही वाटलं की, आपल्याला भरपूर कमाई मिळणार आहे. त्यामुळे तो भाडोत्री शोधायला लागला आणि एक एक करता त्याला दहा-बारा भाडोत्री मिळाले. सुधीर याने आपल्या नातेवाइकांचे आधारकार्ड, पॅनकार्ड दाखवून ॲग्रीमेंट बनवून हेवी डिपॉझिटवर ते रूम भाड्याने दिले व यामध्ये सुधीर यांनी काही रक्कम कमावली व महिंद्र यांनीही कमावली. सुधीर हा आपल्या गावाकडे गेला आणि काही दिवसांनंतर जे भाडोत्री ठेवलेले होते ते महिंद्रला येऊन बोलू लागले की, आम्हाला ज्या रूममध्ये भाडोत्री ठेवलेला आहे, त्या रूमचे मालक येऊन आमच्याकडे भाडं मागत आहेत व तुम्हाला कोणी भाडोत्री ठेवलं, असे विचारत आहे. त्यावेळी महिंद्र त्यांना भेटायला गेला आणि ‘तुम्ही सुधीर याचे नातेवाईक आहात ना आणि याचे हेवी डिपॉझिट घेऊन मी सुधीरला दिलेले आहे’ असं त्याने त्या रूम मालकांना सांगितलं आणि पेपरचे ॲग्रीमेंट त्याने त्या लोकांना दाखवले. जे मालक आले होते, त्यांनी सांगितले की, हा आमचा रूम आहे, याचे मूळ मालक आम्ही आहोत आणि आम्हाला न विचारता हे रूम भाड्याने का दिले गेले. आता रूम खाली करा. भाडोत्री रूम खाली करत नव्हते. कारण डीपॉझिट दिलं होतं. त्यामुळे मूळ मालक बोलायला लागले भाडं आम्हाला द्यायचं. आम्ही सुधीर याला ओळखत नाही. त्यामुळे आता या रूमचे भाडे आम्हालाच मिळायला पाहिजे, असं त्यांनी महिंद्राला ठणकावून सांगितलं. महेंद्र याला काही समजेना म्हणजे सुधीर याने या रूमचे मालक वेगळे दाखवून ॲग्रीमेंट केलेली होती आणि या रूमचे खरोखर वेगळेच मालक होते. हे आता त्याला समजले आणि सुधीर याने आपली फसवणूक केलेली आहे, याची जाणीव आता महिंद्राला झाली. हेवी डिपॉझिट घेतल्यामुळे भाडोत्री भाडं द्यायला तयार नव्हते. महिंद्राला स्वतःच्या खिशातले पैसे रूम मालकाला भाडं म्हणून द्यावे लागत होते. यावर मालक आणि महेंद्र यांनी पोलीस कम्प्लेंट करून सुधीर याचा गावी जाऊन शोध घेतला. सुधीर याने मिळालेला पैशातून गावी चांगला बंगला, दोन कार विकत घेतल्या होत्या. त्याला पोलिसांनी पकडून आणल्यानंतर मी हा व्यवहार केलेला नाही, ‘हे ॲग्रीमेंट या नावाच्या व्यक्तीने झालेले आहे, त्या व्यक्तीला मी ओळखत नाही’, असं त्याने सरळ सांगितलं. त्यामुळे या व्यवहाराची माझा काही संबंध नाही. असं तो पोलिसांना सांगू लागला. पण काही भाडोत्रींनी पोलिसांना सांगितलं की, देवाण-घेवाण होत होते, त्यावेळी हा हजर होता आणि यानेच हे माझ्या नातेवाइकांचे रूम आहेत, असं सांगितलं होतं आणि ते गावाकडे असल्यामुळे त्यांना येणं-जाणं परवडत नाही म्हणून त्यांच्या वतीने मी व्यवहार बघतो, असं आम्हाला सांगितलं होतं. त्यावेळी सुधीर याने पोलिसांना लिहून दिलं की, जे मूळ मालक आहेत त्यांना दर महिन्याला भाडं देत जाईल. असं लिहून स्वतःची सुटका करून घेतली व तो आपल्या गावी पळाला. पण भाडं देण्याच्या वेळेला मात्र महिंद्राला आपल्या खिशातून द्यावं लागत होतं. कारण प्रत्येक वेळी त्याला गावी जाऊन शोधावं लागत असे. या सगळ्या व्यवहारांत महिंद्र चांगल्याच प्रकारे फसला गेलेला होता. कारण हेवी डिपॉझिटची सर्वात जास्त रक्कम सुधीर याने लंपास केलेली होती आणि महिंद्र हा दलाल असल्यामुळे त्याला फक्त दलाली मिळालेली होती. पण तो भाडोत्री ठेवण्यामध्ये पुढे होता, म्हणून मूळ मालकांनी त्यालाच पकडले होते आणि त्याच्याकडून ते भाडं वसूल करत होते.
दलाली चांगली मिळते म्हणून महेंद्र याने मूळ मालकांची चौकशी न करता हेवी डिपॉझिटमध्ये भाडोत्री ठेवून स्वतःच त्या रूमचं आता मूळ मालकांना भाडं देत होता व ज्याचा त्या रूमची काही घेणं- देणं नव्हतं. तो मात्र हेवी डिपॉझिटची भरभक्कम रक्कम घेऊन पसार झालेला होता. मूळ मालक आणि दलाल महेंद्र यांनी आता वकिलांच्या सल्ल्याने सुधीरवर कारवाई करण्याचा निर्णय घेतलेला आहे.
(सत्यघटनेवर आधारित)
Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra