राज्यात आरटीईच्या १९ हजार ३९४ जागा रिक्त

मोठ्या प्रमाणात जाहिरात करूनही प्रतिसाद कमी


मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील खासगी इंग्रजी शाळांमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना २५ टक्के जागा आरक्षित असून त्यासाठी राबविण्यात आलेल्या प्रवेश प्रक्रियेसाठी मोठ्या प्रमाणात जाहिरातबाजी करण्यात आली होती. मात्र यंदा देखील मोठ्या प्रमाणात जागा रिक्त असल्याचे यावेळी निदर्शनास आले आहे. शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) खासगी शाळांतील २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेत यंदा १९ हजार ३९४ जागा रिक्त राहिल्या आहेत. प्रवेश प्रक्रियेद्वारे नियमित प्रवेश जाहीर झालेले विद्यार्थी आणि प्रतीक्षा यादीतील विद्यार्थी अशा एकूण ८२ हजार ४५३ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला.


प्राथमिक शिक्षण संचालनालयातर्फे आरटीई प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येते. यंदा ८ हजार ८२३ शाळांतील १ लाख १ हजार ८४६ जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. त्यासाठी एकूण ३ लाख ६४ हजार ४१३ अर्ज दाखल झाले. प्रवेशासाठीच्या सोडतीतून ९४ हजार ७०० नियमित प्रवेश जाहीर करण्यात आला. नियमित विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाल्यानंतर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांसाठी तीन फेऱ्या राबवण्यात आल्या. त्यात पहिल्या फेरीत १३ हजार ६६०, दुसऱ्या फेरीत ३ हजार ५८३, तिसऱ्या फेरीत एक हजार २५९ आणि चौथ्या फेरीत १८ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. त्यामुळे एकूण उपलब्ध जागांपैकी १९ हजार ३९४ जागा रिक्त राहिल्याचे संकेतस्थळावरील आकडेवारीवरून दिसून येत आहे.

Comments
Add Comment

जन्म नोंदणी आणि प्रमाणपत्र विषयक कार्यवाहीचा महापौर घेणार दर महिन्याला आढावा

मुंबई: जन्म नोंदणी करून त्याचे प्रमाणपत्र देणे, हा फक्त शासकीय दस्तावेज देण्यापुरता मर्यादित विषय नसून त्याचाच

उपमहापौरांची कुपर रुग्णालयाला भेट; स्वच्छता आणि तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणाऱ्यांवर दिले कारवाईचे आदेश

मुंबई: मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी अवघ्या पाच दिवसांपूर्वी विलेपार्ले येथील डॉ. आर. एन. कूपर रुग्णालय येथे

विजय सूर्यवंशी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आयुक्तपदी

मुंबई : राज्य सरकारने बुधवारी प्रशासकीय पातळीवर मोठे फेरबदल केले असून, तीन वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदलीचे

महाविद्यालयीन शुल्कातील गैरप्रकारांची निवृत्त न्यायमूर्तींमार्फत चौकशी

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची विधानसभेत घोषणा; दोषींवर गुन्हे दाखल करण्याचे संकेत मुंबई :

'गॅस तुटवड्याविषयी सरकारने उपाययोजना कराव्यात'

मुंबई : आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे देशासह राज्यात गॅसचा तुटवडा निर्माण झाल्याचे पडसाद बुधवारी

नागरिकांना विनासायास डिजिटल सेवा मिळण्यासाठी व्यापक धोरण तयार करा; माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना शासकीय ई-सेवा आणि आधार संबंधित सेवा कोणत्याही अडथळ्याविना मिळाव्यात,