नाशिक : राज्यभरात सगळीकडे हाहाकार माजवल्यानंतर पावसाने आता विश्रांती घेतली आहे. मात्र नाशिकमध्ये अजूनही शेतकर्यांनी लावलेल्या कांद्याच्या पिकासाठी मुबलक प्रमाणात पाऊस न पडल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे (Nashik Onion Crop Crisis). पावसाची वाट पाहता पाहता दोन महिने उलटले तरीही नाशिकमधील चांदवड तालुक्यात डबके तुंबेल असा पाऊस झालेला नाही. इथला बळीराजा मात्र आभाळाकडे डोळे लावून बसला आहे.
ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दरवर्षी चांदवड तालुक्यातील शेतकरी कांद्याच्या लागवडीत व्यस्त असतात. ही लागवड ऑगस्ट मध्ये करण्यासाठी त्यांची रोपे हे जूनच्या पहिल्या आठवड्यातच टाकावी लागतात. यंदा मात्र रोपे लावायला आली तरी पावसाअभावी कांद्याची लागवड करणे अशक्य झाले आहे. दुष्काळी चांदवडचे लाल कांदा हेच मुख्य नगदी पीक असून या लाल कांद्यावरच इथले सगळे अर्थकारण अवलंबून असते. मात्र या ठिकाणी पावसाने पाठ फिरविल्याने कांदा लागवडीस अडचणी येऊन येथील कांदा उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था अतिशय वाईट झाली आहे.
पाऊस नसल्याने लाल कांद्याच्या लागवडीसाठी उशीर होणार आहे. अजून पंधरा ते वीस दिवस पाऊस आला नाही तर रोपेही वाया जातील अन् कांद्याचे गणित बिघडण्याची दाट शक्यता आहे. त्यातच अगोदरच पेरणी केलेली मका, बाजरी, मुग, भुईमूग यांसारखी पिके देखील पाण्याअभावी सुकायला लागली आहेत. लाल कांद्याची लागवड उशिरा होणार असल्याने उन्हाळ्यात कांद्याचे भाव वाढतील यात शंका नाही.
आग्रा : उत्तर प्रदेशमधील आग्रामध्ये एक धक्कादायक आणि चटपटीत घटना घडली आहे. एका विवाहितेच्या खोलीतून…
नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये अतिरेक्यांनी पर्यटकांवर हल्ला केला. या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू…
मुंबईत महिलेसोबत नेमकं काय घडले? मुंबई : राज्यभरात दिवसेंदिवस अपघात, बलात्कार, आत्महत्या, मर्डर अशा अनेक…
जम्मू : जम्मू-काश्मीरमधील पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या पहलगाममध्ये मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) संपूर्ण…
मुंबई: पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. याच पार्श्वभूमीवर, पाकिस्तानी…
नवी दिल्ली: बुधवारी एअर इंडिया (Air India) आणि इंडिगोसह भारतीय विमान कंपन्या श्रीनगर ते दिल्ली…