Pune Airport news : 'माझ्याकडे बॉम्ब आहे आणि तोही चारही बाजूने'... अफवा पसरवणं आजीबाईला पडलं महागात...

सुरक्षा प्रशासनाची उडाली तारांबळ


पुणे : दिल्लीत राहणार्‍या एका ७२ वर्षीय आजीबाईला पुणे ते दिल्ली (Pune to Delhi) विमानाने प्रवास करायचा होता, पण पुणे विमानतळावर (Pune Airport) चेकिंगदरम्यान या आजीबाईने पोलिसांना थेट तिच्याकडे बॉम्ब असल्याची धमकी दिली. आजीबाईंची तब्बल एक तासभर चौकशी केल्यानंतर जे कारण समोर आलं त्याने तुम्हालाही हसावं की चुकचुकावं असा प्रश्न पडेल.


पुणे ते दिल्ली असा प्रवास करण्यासाठी ही आजीबाई सकाळी पुणे विमानतळावर दाखल झाली. नीता प्रकाश कृपलानी (वय ७२, रा. सूर्यविहार, गुडगाव इंडस्ट्रियल कॉम्प्लेक्स, दिल्ली) असे तिचे नाव आहे. विमानतळावर सकाळी बऱ्याच फ्लाईट्स असतात, त्यामुळे सुरक्षा तपासणीसाठी वेळ लागत होता. दरम्यान सुरक्षा तपासणी दरम्यान बूथमध्ये पोलीस अधिकारी जेव्हा आजीबाईंचा तपास करत होत्या तेव्हा त्यांनी "एवढं काय तपासत आहेत? माझ्याकडे बॉम्ब आहे आणि तो चारही बाजूने" असं सांगितलं. यामुळे विमानतळावर गोंधळ उडाला.


या प्रकरणी पुणे पोलीस यंत्रणा आणि बॉम्ब स्कॉड कामाला लागली. किमान तासभर आजीबाईंची चौकशी केली असता त्यांनी रागाच्या भरात सगळी धमकी दिल्याचं समोर आलं. विमानतळावर चेकिंगसाठी उशीर होत असल्याने त्या वैतागल्या आणि राग अनावर होऊन बॉम्ब असल्याचं सांगितलं मात्र त्यानंतर यंत्रणा कामाला लागल्यानंतर पोलिसांनी थेट त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे अशा प्रकारे धमकावणं आजीला चांगलंच महागात पडलं आहे.


महिला पोलीस कर्मचारी दीपाली बबनराव झावरे (रा. कलवड वस्ती, लोहगाव, पुणे) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यावरून पुणे विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक एस. आर. करपे करीत आहेत. नीता कृपलानी या आजीबाईंवर गुन्हा दाखल झाला असून त्यांना कारणे दाखवा नोटीसही देण्यात आली आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

मोठी बातमी! 'या' कारणासाठी पुण्यातील भीमाशंकर मंदिर राहणार ३ महिने बंद

पुणे : श्री क्षेत्र भीमाशंकर येथे सुरू होणाऱ्या मोठ्या विकासकामांमुळे मंदिर भाविकांसाठी तात्पुरते बंद

निवडणुकीत नातवाचे तिकीट कापताच आजीने धरलं 'या' मंत्र्याला धारेवर

कोल्हापूर : राज्यात सर्वच्या सर्व २९ मनपांसाठी १५ जानेवारीला मतदान आणि १६ जानेवारीला मतमोजणी तसेच निकाल आहे. या

धक्कादायक! चंद्रपुरात पतीकडून पत्नीची जिवंत जाळून हत्या; दरवाजाला कडी लावून फरार

चंद्रपूर : महाराष्ट्रात स्त्रियांवरील अत्याचार आणि हुंडाबळीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असतानाच,

Ghodbunder Accident: घोडबंदर रोडवर मोठा अपघात, अनेक गाड्या एकमेकांवर आदळल्या

ठाणे: ठाणे शहरातील घोडबंदर रोडवर आज सकाळी साखळी अपघाताची घटना घडली. गायमुख ट्रॅफिक चौकीसमोर, ठाणे ते मीरा रोड

जळगावमध्ये महापौर आरक्षणाची टांगती तलवार

जळगाव: महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराची सुरुवात केली आहे. आता शहरात

Nashik Accident : शिर्डीला साई बाबांच दर्शन घेतल अन् घरी परताना रस्त्यामध्येच...चौघे जागेवरच ठार!

नाशिक: नाशिक जिल्ह्यातील आंबेगन शिवाराजवळ राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी सकाळी दोन वाहनांची समोरासमोर भीषण