Tesla Office in Pune : टेस्लाचे पुण्यात कार्यालय! भारतीय बाजारपेठेत प्रवेश करण्यासाठी सज्ज!

Share

पुणे : एलॉन मस्क (Elon Musk) यांच्या टेस्ला (Tesla) इंडिया मोटर अँड एनर्जी कंपनीने पुण्यात (Pune) विमान नगर येथे कार्यालयासाठी प्रशस्त जागा भाडेतत्त्वावर (Tesla Office in Pune) घेतली आहे. याचा अर्थ लवकरच कंपनी भारतात गुंतवणूक करेल हे निश्चित झाले आहे.

टेस्ला कंपनी गेल्या काही महिन्यांपासून भारतामध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र अजूनतरी कंपनीला पूर्णतः यश प्राप्त झालेले नाही. अजूनही टेस्लाचे उच्च अधिकारी भारतातील सरकारी अधिकार्‍यांशी चर्चा करत आहेत.

मात्र मिळालेल्या माहितीनुसार, ऑक्टोबरपासून कंपनीला विमान नगर, लोहेगाव येथील पंचशील बिझनेस पार्कच्या टॉवर बी मध्ये इलेक्ट्रिक वाहने आणि ऊर्जा व्यवसाय चालवण्यासाठी जागा प्राप्त होईल. टेबलस्पेस टेक्नॉलॉजीजकडून एकूण ५,८५० चौरस फूट जागा ११.६५ लाख रुपये प्रति महिना भाड्याने टेस्लाला देण्यात आली आहे. सीआरई मॅट्रिक्स या रिअल इस्टेट डेटा अॅनालिटिक्स फर्मद्वारे हे दस्तऐवज उपलब्ध झाले आहेत. ज्यानुसार, या जागेसाठी ३४.९५ लाख रुपये मुद्रांक शुल्क भरण्यात आले असून, भाडे दस्तऐवजाची नोंदणी २६ जुलै रोजी करण्यात आली आहे.

भाडे करारातील तपशील दर्शविते की कंपनीला पाच कार पार्किंग आणि १० दुचाकी पार्किंग स्लॉट देखील मिळतील. ही लीज ३ वर्षांच्या लॉक-इन कालावधीसह ५ वर्षांसाठी आहे. `दरवर्षी याचे भाडे ५ टक्क्यांनी वाढेल. फ्लोअर लेआउट प्लॅनमध्ये ३ कॉन्फरन्स किंवा मीटिंग रूम आणि स्टाफसाठी ४१ जागा असतील.

अहवालानुसार, टेस्ला ५ लाख इलेक्ट्रिक वाहने तयार करण्यासाठी आणि भारतीय उपखंडाव्यतिरिक्त इंडो-पॅसिफिक बाजारपेठेची पूर्तता करण्यासाठी देशाला निर्यात केंद्रांपैकी एक बनवण्यासाठी भारतात कारखाना सुरू करण्याचा विचार करत आहे. याआधी २०२२ मध्ये, कार आयात करण्यासाठी विशेष प्रोत्साहन नसल्यामुळे कंपनीची भारतात बेस स्थापन करण्याची योजना मागे पडली होती.

दरम्यान, नुकतेच टेस्लाचे संस्थापक इलॉन मस्क यांनी गेल्या महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. तेव्हा मस्क यांनी सांगितले होते की, ते देशात कार-निर्मिती सुविधेत गुंतवणूक करत आहेत. आता ऑक्टोबरपासून पुण्यात कार्यालय सुरू होणार असल्याने अनेक तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Recent Posts

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य, रविवार, १३ ते १९ एप्रिल २०२५

साप्ताहिक राशिभविष्य, रविवार, १३ ते १९ एप्रिल २०२५ आर्थिक परिस्थिती मनासारखी राहील मेष : हा…

2 hours ago

World Book Day : भूतकाळासह भविष्यकाळातील दुवा म्हणजेच ‘पुस्तकं’

मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…

3 hours ago

‘टीनएजर्सच्या पालकांकडून अपेक्षा’

डाॅ. स्वाती गानू वयाची दहा-बारा वर्षे मुलांशी आपण किती सहज बोलू शकतो, गप्पा मारू शकतो,…

4 hours ago

समाजवादी विचारवंत ना. ग. गोरे

सतीश पाटणकर नारायण गणेश गोरे तथा नानासाहेब गोरे हे समाजवादी विचारवंत तसेच मराठी लेखक आणि…

4 hours ago

राखी वटवट्या

डॉ. महालक्ष्मी वानखेडकर इवलासा चिमणीसारखा अस्थिर जीव जेमतेम दहा-बारा सेंटीमीटरचा. नाकापासून ते पाठीपर्यंत काळ्या रंगाचे…

4 hours ago

“ठाऊक आहे का तूज काही?”

श्रीनिवास बेलसरे चित्रपटसृष्टीतील जुन्या कलाकारांनी, विशेषत: गीतकारांनी, सगळ्या नात्यांना किती सुंदरपणे प्रेक्षकांसमोर आणले ते पाहिले…

4 hours ago