Sunday, July 21, 2024
Homeताज्या घडामोडीRation Card: आता महाराष्ट्र शासन देणार मोफत ई - शिधापत्रिका

Ration Card: आता महाराष्ट्र शासन देणार मोफत ई – शिधापत्रिका

नवीन शिधापत्रिकेसाठी अर्ज करणाऱ्यांना मिळणार दिलासा

नवीन शिधापत्रिकेसाठी(Ration Card) अर्ज करणाऱ्या अर्जदाराला महाराष्ट्र शासनाने ऑनलाईन सेवेद्वारे ई-शिधापत्रिका मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती शिधावाटप कार्यालय क्रमांक ४१ फ ठाणेचे शिधावाटप अधिकारी सु. अ. जड्यार यांनी दिली आहे.

महाराष्ट्र शासन अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग शासन निर्णय क्रमांक शिवाप/२०२१/प्र.क्र.१९/नापु२८/मंत्रालय दि. १६ मे २०२३ नुसार सर्व शिधापत्रिका धारकांना तसेच नवीन शिधापत्रिकेसाठी अर्ज करणाऱ्या अर्जदाराला महाराष्ट्र शासनाने ऑनलाईन सेवेद्वारे ई – शिधापत्रिका(Ration Card) मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार महाराष्ट्र शासन MAHAFOOD पोर्टलवर ई- शिधापत्रिका करिता https:/rcms.mahafood.gov.in या वेबसाईटवर अर्ज करावा. अर्जदारांनी शिधापत्रिकेसाठी ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर प्रचलित कार्यपद्धतीनुसार तपासणी करून योजनेच्या प्रकारानुसार ऑनलाईन ई-शिधापत्रिका उपलब्ध करून देण्यात येईल. अर्जदारास संबंधित संकेतस्थळावरून सदर ई-शिधापत्रिका डाऊनलोड करता येईल. सर्व शिधापत्रिकाधारक व अर्जदार यांनी सदर सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सु.अ. जड्यार यांनी केले आहे.

महाराष्ट्र शासनाच्या ऑनलाईन शिधापत्रिका मोफत देण्याच्या या महत्वपूर्ण निर्णयामुळे आता सर्वसामान्य नागरिकांना शिधावाटप कार्यालयात निष्कारण फेऱ्या माराव्या लागणार नाहीत, मनस्ताप होणार नाही व आर्थिक फटकाही बसणार नाही तसेच ऑनलाईन प्रक्रियेमुळे शिधापत्रिकेचे काम हे अधिक सुस्पष्टतेने, अधिक पारदर्शकतेने व अधिक जलदतेने होऊन सर्वसामान्य नागरिकांना तत्काळ शिधापत्रिका मिळणे सोपे जाईल, असे मतही शिधावाटप अधिकारी सु.अ जड्यार यांनी व्यक्त केले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -