ज्ञानवापीच्या एएसआय सर्व्हेचा मार्ग मोकळा!

लखनऊ : ज्ञानवापी मशीद परिसरात एएसआय सर्व्हेक्षणाला अलाहाबाद हायकोर्टाने मंजुरी दिली आहे. एएसआय सर्व्हेक्षणाला याआधी हायकोर्टानेच स्थगिती दिली होती.


वाराणसीचे जिल्हा न्यायाधीश अजय कुमार विश्वेश यांनी ज्ञानवापीच्या सर्व्हेक्षणाचे आदेश दिले होते. या निर्णयाला हाय कोर्टाने कायम ठेवले आहे. यामुळे एएसआयवर लावण्यात आलेली बंधने देखील हटवली आहेत. जिल्हा न्यायालयाच्या निर्णयानंतर एएसआयने २४ जुलैपासून सर्व्हेक्षणाला सुरवात केली होती. यामुळे मशीद कमिटी सर्वोच्च न्यायालयात गेली होती.


सर्वोच्च न्यायालयाने एएसआय सर्वेक्षण तात्काळ थांबवताना २६ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत निकाल देण्याचे आदेश हायकोर्टाला दिले होते. त्यावर सुनावणी होऊन हायकोर्टाने २७ जुलै रोजी निर्णय राखून ठेवला होता. हायकोर्टाने ३ ऑगस्ट रोजी निकाल देण्याचे जाहीर केले होते. आज हा निर्णय आला आहे. यामुळे आजपासूनच सर्व्हेक्षण सुरु होण्याची शक्यता आहे.


जिल्हा न्यायालयाने एएसआयला सर्वेक्षणाचे काम पूर्ण करून ४ ऑगस्टपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. मात्र, हे प्रकरण न्यायालयात गेल्याने विलंब झाला आहे. ज्ञानवापी कॅम्पसच्या एएसआय सर्वेक्षणाबाबत वाराणसीचे जिल्हा न्यायाधीश डॉ. अजय कुमार विश्वेश यांच्या न्यायालयात ४ ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे. सर्वेक्षणासंबंधीचा स्टेटस रिपोर्ट एएसआय न्यायालयात सादर करण्याची शक्यता आहे. यानंतर त्यांना पुढील मुदत दिली जाणार आहे.

Comments
Add Comment

BCCI Naman Awards 2026: गिल-मानधना यांचा सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू पुरस्काराने सन्मान; बिन्नी, द्रविड आणि मिताली यांचाही सन्मान

नवी दिल्ली: भारताचा कसोटी कर्णधार शुभमन गिल आणि स्मृती मानधना यांना २०२४-२०२५ मधील उत्कृष्ट कामगिरीसाठी रविवारी

२१ वर्षीय जैन भिक्षूचा मृत्यू; १५ व्या वर्षी दीक्षा, सहा वर्षात मृत्यू

पालघर: सहकाऱ्यांसोबत पायी तीर्थयात्रेवर निघालेल्या २१ वर्षीय जैन भिक्षू यांच्या मृत्यूने जैन समाजात शोककळा

चीनमधील तरुण-तरुणी AI पार्टनर गेल्याच्या दुखात, Cyber ​​Widowhood आहे तरी काय?

नवी दिल्ली: चीनमधील एक संकल्पना सध्या जगभराचं लक्ष वेधून घेत आहे. या संकल्पनेचं नाव आहे Cyber Widowhood. म्हणजेच सायबर

'अतिरेक्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानशी मैत्री होणार नाही'

जम्मू : अतिरेक्यांना आश्रय देणे थांबवून आतंकवाद संपवला तरच पाकिस्तानशी मैत्रीची चर्चा होईल. मात्र दहशतवाद

भारतात चॅट जीपीटीपेक्षा लोकप्रिय झाले इंडियन ऑइल कंपनीचे अ‍ॅप

नवी दिल्ली : गूगल प्ले स्टोअर आणि अ‍ॅपल अ‍ॅप स्टोअर या दोन प्लॅटफॉर्मवर सध्या चॅट जीपीटीपेक्षा इंडियन ऑइल

उरीमध्ये घुसखोरीचा प्रयत्न उधळला, पाकिस्तानी दहशतवादी ठार

बारामुल्ला : भारतीय सैन्याने जम्मू काश्मीरमधील उरी सेक्टरमधील बुछारमधून घुसखोरी करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न