Seema haider to be Bollywood heroine : ऐकावं ते नवलच! सीमा हैदरला चित्रपटात काम करण्याची ऑफर...

सचिन आणि सीमाचं जोडपं आता होणार बॉलिवूड हिरो-हिरोईन


मुंबई : सीमा हैदरच्या (Seema Haider) प्रकरणात नवनवीन गोष्टी ऐकायला मिळत आहेत. तिच्या पावलांवर पाऊल ठेवत काही तरुणी देखील प्रियकराला भेटण्यासाठी एका देशातून दुसर्‍या देशात जात आहेत (Love beyond Boundaries). स्वतःच्या प्रेमासाठी कोणत्याही अधिकृत प्रक्रियेशिवाय थेट भारतात घुसणारी सीमा हैदर ही प्रचंड चर्चेचा विषय बनली आहे. एखादी फिल्मी कथाच वाटावी असं हे प्रकरण सध्या खूप गाजतंय. त्यातच आता चित्रपटात काम करण्यासाठी एक उत्तम संधी मिळावी याकरता वर्षांनुवर्षे मेहनत करणार्‍यांच्या नाकावर टिचून सीमा हैदरला बॉलिवूडची (Bollywood) ऑफर आली आहे. मेरठमधील एका निर्मात्याने सीमा हैदरसोबत सचिन मीनालाही आपल्या चित्रपटात काम करण्याची ऑफर दिली आहे.


पाकिस्तानी सीमा हैदरला बॉलिवूड निर्माता अमित जानी (Amit Jani) यांच्याकडून चित्रपटाची ऑफर मिळाली आहे. तर सचिन मीनालाही बॉलिवूड चित्रपटात काम करण्याची ऑफर आली आहे. सीमा आणि सचिनची यांची प्रेम कहाणी बऱ्याच दिवसांपासून व्हायरल झाली आहे. यानंतर एका निर्मात्याने त्यांना चित्रपटात काम करण्याची ऑफर दिली असून त्यांना मदत करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकलं आहे. दरम्यान, हा चित्रपट त्याच्या प्रेमकथेवर आधारित नसून राजस्थानमधील टेलर कन्हैयाच्या हत्येवर आधारित आहे.


पाकिस्तानी सीमा आणि भारतीय सचिन यांची मैत्री पबजी खेळताना झाली. ऑनलाईन गेम खेळताना दोघांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. सचिनसाठी सर्व सीमा पार करत पाकिस्तानातून आपल्या चार मुलांना घेऊन नेपाळमार्गे भारतात येणारी सीमा आता या चित्रपटाची ऑफर स्वीकारणार का, हे पाहावं लागेल.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

दिल्लीकरांसाठी महाराष्ट्र सदनात ग्रामीण संस्कृतीची मेजवाणी

९ ते ११ जानेवारीदरम्यान ‘हुरडा पार्टी’ आणि ‘मकर संक्रांत नवी दिल्ली : दिल्लीकरांना महाराष्ट्राच्या ग्रामीण

अयोध्येत रामभक्तांची गर्दी

४ लाख भाविकांनी घेतले रामललाचे दर्शन लखनऊ : अयोध्येतील भव्य श्रीराम मंदिराचा दुसरा वर्धापन दिन अतिशय उत्साहात

माओवादी कमांडर बारसे देवाचे तेलंगणात आत्मसमर्पण

तेलंगणा : ‎छत्तीसगडमधील नक्षली चळवळीचा कणा मानला जाणारा व दरभा डिव्हिजनल कमिटीचा सचिव बारसे देवा ऊर्फ सुक्का

FASTag Rules : आता टोल नाक्यावरुन सुसाट जा...! फास्टॅगच्या 'KYV' कटकटीतून कायमची सुटका; NHAI चा मोठा निर्णय.

नवी दिल्ली : नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच केंद्र सरकार आणि भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI)

उद्या अवकाशात 'सुपर मून'ने उजळणार रात्र!

चंद्र पृथ्वीच्या अत्यंत जवळ येणार नवी दिल्ली : नववर्ष २०२६ च्या सुरुवातीलाच अर्थात उद्या ३ जानेवारी २०२६ रोजी

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संघटनात्मक रचनेत लवकरच बदल

प्रयागराज : शताब्दी वर्ष साजरे करणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपल्या संघटनात्मक रचनेत बदल करण्याची तयारी