कर्जत : मराठी आणि हिंदी मनोरंजनसृष्टीत कला दिग्दर्शनासाठी असलेलं मोठं नाव म्हणजे नितीन चंद्रकांत देसाई (Nitin Chandrakant Desai). त्यांनी आत्महत्या केल्याच्या खळबळजनक बातमीने अख्खी चित्रपटसृष्टी हादरली आहे. कर्जत येथील त्यांच्या एन. डी स्टुडिओमध्ये (N.D. Studio) गळफास घेत वयाच्या ५८ व्या वर्षी त्यांनी आपलं आयुष्य संपवलं. त्यांच्या आत्महत्येचे कारण मात्र अद्याप स्पष्ट होऊ शकले नसले तरी त्यांच्या जीवनात असलेल्या काही अडचणी समोर येत आहेत. या अडचणींची पडताळणी करुन शोध घेण्याचा पोलीस पूर्णपणे प्रयत्न करत आहेत.
आत्महत्येमागे दोन कारणे समोर येत आहेत. एक आर्थिक संकट, दुसरी वैद्यकीय समस्या. मात्र, याची अद्याप पुष्टी झालेली नाही. काही काळापूर्वी समोर आले होते की त्यांच्या मुलीच्या लग्नानंतर त्यांची वैद्यकीय समस्या खूप वाढली आहे. त्यांच्या पश्चात दोन मुली व एक मुलगा असा परिवार आहे. दोन्ही मुली अमेरिकेत राहतात. मुलगा शिकत आहे.
मिळालेल्या एका माहितीनुसार, मागील काही दिवसांपासून त्यांच्या एनडी स्टुडियोवर जप्तीची टांगती तलवार असल्याचे समजत आहे. मुंबईतील एडलवाईस अॅसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनीने मालमत्ता जप्त करण्यासाठी रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे परवानगी मागितली होती. हे प्रकरण रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे दोन महिने प्रलंबित होते. परंतु या प्रकरणाबाबत सविस्तर खुलासा झालेला नाही.
मे महिन्यात एका जाहिरात संस्थेने देसाई यांच्यावर ५१.७ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप केला होता. एजन्सीने तीन महिने काम करूनही देसाई यांनी पैसे दिले नसल्याचे सांगितले होते. मात्र, नितीनने हे आरोप फेटाळून लावले. यापूर्वीही एजन्सीने आपल्यावर असेच आरोप केले होते, असे ते म्हणाले होते.
आमदार महेश बालदी यांनी बुधवारी सांगितले की, देसाई आर्थिक संकटाचा सामना करत होते. देसाई यांनी सात महिन्यांपासून कर्मचाऱ्यांना पगार दिला नसल्याचे स्टुडिओतील कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले. ते खर्चासाठी थोडे पैसे देत होते. स्टुडिओ मॅनेजरसह बहुतांश कर्मचाऱ्यांनी नोकरी सोडली होती.
या सर्व अडचणी असल्या तरी नितीन देसाई यांची कारकीर्द खूप मोठी राहिली आहे. त्यांची अशा प्रकारे आत्महत्या चटका लावून जाणारी आहे. यासंबंधी पोलिसांचा तपास सुरु आहे.
मुंबई(ज्ञानेश सावंत):सुरवातीच्या सामन्यात चेन्नईने मुंबईला फिरकीच्या जोरावर पराभवाचे पाणी पाजले. परंतु तो सामना चेन्नईच्या घरच्या…
पूजा काळे सृष्टीचे तत्त्व सांभाळा, नेहमीची येतो उन्हाळा. वर्षभरात तीन ऋतूंच्या तीन तऱ्हा सांभाळताना होणारा…
पुणे : काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रात अध्यक्ष बदलला आहे. हर्षवर्धन सपकाळ महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष झाले आहेत.…
डॉ. वीणा सानेकर भाषा हा शिक्षणातील पायाभूत घटक आहे. ती माणसाच्या अस्तित्वाची ओळख असल्यामुळे शिक्षणातील…
अर्चना सोंडे जगात ज्या काही दुर्मीळ आदिवासी जमाती आहेत. ज्यांचे पृथ्वीवरील अस्तित्व संपल्यात जमा झाले…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण सप्तमी शके १९४७. चंद्र नक्षत्र पूर्वाषाढा. योग सिद्ध. चंद्र राशी…