मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचा रुग्ण सेवेचा चढता आलेख

  100

१३ महिन्यांत १२ हजार पेक्षा जास्त रुग्णांना ९८ कोटी ९८ लाखांची मदत वितरित


गंभीर व दुर्धर आजार असणाऱ्या गरजू रुग्णांनी लाभ घेण्याचे आवाहन


मुंबई : मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाने रुग्ण सेवेत उत्कृष्ट कामगिरी करुन राज्यातील हजारो रुग्णांच्या जीवनात निरामय आरोग्याचा प्रकाश आणला आहे. आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीचा आलेख कायम राखत या कक्षाने अवघ्या १३ महिन्यांत कक्षाकडून १२०८५ रुग्णांना एकूण ९८ कोटी ९८ लाख रुपयांची मदत दिली आहे.


या योजनेंतर्गत गरजू रुग्णांना गंभीर व महागड्या शस्त्रक्रियांसाठी थेट अर्थसहाय्य मिळत असल्याने आणि संबंधित रुग्णांचे प्राण वाचत असल्याने जास्तीत गरजू रुग्णांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे नम्र आवाहन मुख्यमंत्री वैद्यकीय वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.


महाविकास आघाडी सरकारच्या काळात बंद पडलेला मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष मुख्यमंत्रीपदी विराजमान होताच श्री. शिंदे यांनी त्वरित सुरू करत या योजनेचे मूळ संकल्पक असलेल्या मंगेश चिवटे यांची कक्ष प्रमुख पदी निवड केली होती. पहिल्या दिवसापासूनच श्री चिवटे आणि त्यांच्या सर्व टीमने रुग्णसेवेत झोकून दिले आहे.


त्यामुळेच पहिल्याच जुलै महिन्यात १७९ रुग्णांना ७६ लाखांची मदत देण्यात आली. नंतर ऑगस्ट महिन्यात २४४ रुग्णांना १ कोटी ०१ लाख, सप्टेंबर महिन्यात ३१९ रुग्णांना १ कोटी ८६ लाख, ऑक्टोबर महिन्यात २७६ रुग्णांना २ कोटी ३५ लाख, नोव्हेंबर महिन्यात ५२७ रुग्णांना ४ कोटी ५० लाख,डिसेंबर महिन्यात १०३१ रुग्णांना ८ कोटी ५२ लाख, जानेवारी २०२३ मध्ये १०३२ रुग्णांना ८ कोटी ९० लाख तर फेब्रुवारी २०२३ मध्ये १२७४ रुग्णांना १० कोटी ५९ लाख, मार्च २०२३ मध्ये १४६९ रुग्णांना ११ कोटी ९3 लाख, एप्रिल २०२३ मध्ये ११९० रुग्णांना ९ कोटी ९१ लाख, मे २०२३ मध्ये १३२९ रुग्णांना ११ कोटी २५ लाख, जून २०२३ मध्ये १७२८ रुग्णांना १४ कोटी ६२ लाख, तर जुलै मध्ये विक्रमी १४८८ रुग्णांना १२ कोटी ७२ लाख रुपयांची वैद्यकीय मदत देण्यात आली आहे.


राज्यातील एकही सर्वसामान्य - गोरगरीब गरजू रुग्ण पैशाअभावी उपचाराविना राहणार नाही याची काळजी घ्या, असा आदेशच संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी आम्हाला पहिल्या दिवशी दिला होता. त्यांच्या सुचनेचे तंतोतंत पालन करण्याचा आणि रुग्णांना दिलासा देण्याचा आम्ही सर्व सहकारी प्रामाणिक प्रयत्न करतो असे कक्ष प्रमुख मंगेश नरसिंह चिवटे यांनी शेवटी सांगितले आहे.

Comments
Add Comment

आदिवासी जमिनींच्या गैरहस्तांतरणाची चौकशी होणार- चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई : राज्यातील आदिवासींच्या जमिनींचे बिगर आदिवासींकडे झालेल्या गैरहस्तांतरणाच्या

पडळकरांनी सांगितलेलं 'ते' कॉकटेल घर तुम्हाला माहिती आहे का?

पडळकरांची 'कॉकटेल कुटुंब' टिप्पणी, पवारांना अप्रत्यक्ष

मत्स्यव्यवसाय क्षेत्रात प्रथमच डिजिटल क्रांती ; AI तंत्रज्ञानासाठी ऐतिहासिक करार

मत्स्यव्यवसाय क्षेत्रात AI तंत्रज्ञानाचा पहिला करार! मंत्री

कल्याण पश्चिम परिसरात ऐन पावसाळ्यात कचऱ्यांचे ढीग, तीन दिवसांपासून घंटागाड्यांची प्रतीक्षा

कल्याण (प्रतिनिधी) : केडीएमसीने शहर स्वच्छ सुंदर असावे यासाठी कोट्यवधींची तरतूद केलेली असताना, कल्याण-डोंबिवली

वारीदरम्यान ९ लाखांहून अधिक वारकऱ्यांनी घेतला आरोग्य सेवेचा लाभ

सोलापूर : आषाढी एकादशीनिमित्त देहू-आळंदी ते पंढरपूर व इतर जिल्ह्यांतून आलेल्या वारकरी भक्तांना सार्वजनिक

11th Admission: अकरावीच्या पहिल्या फेरीत सहा हजार विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारले, कारण...

योग्य कागदपत्रे सादर न केल्याने, तसेच अर्जामध्ये चुका करण्यात आल्याने प्रवेश नाकारला मुंबई: राज्यात अकरावी