छत्रपती संभाजीनगर : पावसाळ्याच्या दिवसांत पिकनिकला (Monsoon Picnic)जाण्याची एक वेगळीच मज्जा असते. अनेकजण खास सुट्टी काढून आपल्या मित्रांसोबत पिकनिकला जायचा बेत आखतात. मात्र हल्ली आनंद घेण्यापेक्षा सोशल मीडियावर (Social Media) दिखाव्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळेच की काय अनेकजण वाहत्या पाण्याच्या ठिकाणी जाऊन सेल्फी (Selfie) काढतात, रील्स (Reels)बनवतात आणि कधीकधी तोल सावरता न आल्याने आपला जीव गमावून बसतात. याच घटना होऊ नयेत याकरता छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) येथील गौताळा अभयारण्यात (Gautala Sanctuary) पर्यटकांना १५ सप्टेंबरपर्यंत येण्यास बंदी घातली आहे.
यंदाच्या पावसाळ्यात सहलींदरम्यान अनेक लोक पाण्याच्या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याच्या घटना समोर आल्या आहेत. तर काहीजण फोटोशूट करता करता तोल जाऊन पडल्याच्याही घटना आहेत. गौताळा अभयारण्यात देखील जास्त प्रमाणात पाऊस पडून नाल्यांना पूर येत असतो. त्यामुळे येथे येणारे अनेक पर्यटक सेल्फी काढण्याच्या मोहात दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. पर्यटकांच्या जीवितास धोका पोहोचू शकतो, यामुळे १५ सप्टेंबरपर्यंत हे अभयारण्य पर्यटकांसाठी बंद करण्यात आले आहे.
मागील काही दिवसांत झालेल्या कमी-अधिक पावसामुळे पर्यटनस्थळावर पर्यटकांची गर्दी वाढली आहे. लेण्या, धबधबे, धार्मिक स्थळे, ऐतिहासिक स्थळे, किल्ले यांना भेट देणाऱ्यांची संख्या वाढली आहे. पावसाळ्यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात देखील अनेक पर्यटनस्थळे पर्यटकांच्या गर्दीने फुलून जातात. गौताळा अभयारण्यात देखील अशीच पर्यटकांची गर्दी पाहायला मिळत असते. पावसाळ्यात अधिक खुलून दिसणारे गौताळा अभयारण्य पर्यटकांना आकर्षित करते. मात्र, आता वनविभागाने १५ सप्टेंबरपर्यंत पर्यटकांना येथे प्रवेश बंदी घातली असून, तसे आदेश काढण्यात आले आहेत. त्यामुळे पर्यटकांचा हिरमोड झाला असून, गौताळा अभयारण्य पाहण्यासाठी त्यांना आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे.
येत्या २ मे ते १२ जून २०२५ या कालावधीत भरणार हे वाचनालय महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांसमवेत खासगी…
चंद्रपूर : गेल्या आठवड्यापासून चंद्रपूर जिल्ह्याला तीव्र उन्हाचा तडाखा बसत असून दिनांक २१ ते २४…
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…