Maharashtrachi Hasyajatra : तुमच्या टेन्शनवरची मात्रा... महाराष्ट्राची हास्यजत्रा! नव्या पर्वाचं शुटींग सुरु...

प्राजक्ता माळीने शेअर केला खास व्हिडीओ...


मुंबई : महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांना खळखळून हसवणार्‍या सोनी मराठी (Sony Marathi) वाहिनीवरील 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra) या मालिकेच्या नव्या पर्वाचे शुटींग सुरु झाले आहे. लॉकडाऊनमध्ये विशेष लोकप्रियता मिळवलेली हास्यजत्रा आता लोकप्रियतेच्या शिखरावर जाऊन पोहोचली आहे. नुकतंच हास्यजत्रेच्या टीमने परदेश दौरा केला. यातील कलाकार सातत्याने या परदेश दौर्‍याचे काही व्हिडीओज सोशल मीडियावर (Social Media) शेअर करत होते. आज हास्यजत्रेची सूत्रसंचालिका प्राजक्ता माळी (Prajakta Mali) हिने एक व्हिडीओ शेअर हास्यजत्रेचे शुटींग सुरु झाल्याची आनंदाची बातमी दिली आहे.


प्राजक्तानं 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाच्या सेटवरील व्हिडीओ शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, 'आणि काल शूटींगला सुरूवात झाली… खूप आवश्यक असणाऱ्या लाफ्टर थेरपीची सुरू झाली आहे. १४ ऑगस्ट पासून सोम-गुरू रात्री ९ वाजता.' प्राजक्तानं शेअर केलेल्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.





सई ताम्हणकरने (Sai Tamhankar) देखील 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाच्या सेटवरील एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये प्रसाद ओक (Prasad oak)आणि प्राजक्ता माळी देखील दिसत आहेत. या व्हिडीओला सईनं 'Back to MHJ' असं कॅप्शन दिलं आहे.


'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमातून समीर चौघुले (Sameer Choughule), नम्रता संभेराव (Namrata Sambherao), प्रसाद खांडेकर (Prasad Khandekar), वनिता खरात (Vanita Kharat), प्रभाकर मोरे (Prabhakar More), गौरव मोरे (Gaurav More), शिवाली परब (Shivali Parab), पृथ्वीक प्रताप (Pruthvik Pratap), दत्तु मोरे (Dattu More), प्रियदर्शनी इंदलकर (Priyadarshini Indalkar), ईशा डे (Esha Dey) असे सर्वच कलाकार प्रेक्षकांची मने जिंकतात. त्यामुळे नव्या पर्वाची सर्वच प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

Anant Ambani : हिप्पोंना मारु नका, वनतारामध्ये पाठवा; अनंत अंबानी यांची कोलंबिया सरकारला विनंती

मुंबई : उद्योगपती अनंत अंबानी यांचे प्राणीप्रेम पुन्हा एकदा समोर आले आहे. दक्षिण अमेरिकेतील कोलंबिया देशात

Mumbai News : मुंबईत पाण्याचा निचरा करण्यासाठी ५४७ पंपांची आणि फिरते डीवॉटरिंग पंप असणाऱ्या १० वाहनांची व्यवस्था

मुंबईत यंदा पाणी साचण्याची फक्त ८० ठिकाणे मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईत पावसाळ्यात पाणी साचणाऱ्या ठिकाणांची

BMC News : 'मध्य वैतरणा प्रकल्प राबवताना तुमचे पर्यावरण प्रेम कुठे होते?'

मुंबई : मुंबई महापालिकेच्यावतीने गारगाई पाणी प्रकल्पाच्या कामाला गती देण्यासाठी स्थायी समिती व महापालिका

single-window clearance : लाईव्ह इव्हेंट्स परवानगीसाठी ‘एक खिडकी’ सुविधा

मुंबई : राज्यातील लाईव्ह मनोरंजन क्षेत्राला चालना देण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. लाईव्ह

Godavari to Narmada : असा होणार गोदा ते नर्मदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रेचा समारोप समारंभ

मुंबई : जलव्यवस्थापन अधिक गतिमान, लोकाभिमुख आणि जनसहभागातून प्रभावी करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या

Seeds Act : राज्याचा स्वतंत्र बियाणे कायदा करणार

मुंबई : शेतकऱ्यांना स्वतःचे बियाणे साठवणे, वापरणे, देवाणघेवाण करणे आणि (ब्रँडेड नाव न वापरता) विक्री करण्यास