Rain updates : राज्यात ऑगस्ट महिन्यात कमी पाऊस

भारतीय हवामान विभागाचा अंदाज


मुंबई : देशभरात ऑगस्ट महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. पुढील दोन महिने मान्सून सामान्य राहण्याची शक्यता आहे. जुलै महिन्यात पावसाने धुमाकूळ घातला होता. पण पुढील दोन महिने सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाकडून मान्सूच्या पुढील दोन महिन्यांसाठीचा अंदाज जाहीर करण्यात आला आहे. मान्सूनमध्ये अल निनोचा प्रभाव वाढत जाण्याचा अंदाज आहे. दरम्यान, राज्यात ऑगस्ट महिना कोरडा जाणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. ऑगस्टचा पहिला आठवडा सोडला तर राज्यात पाऊस कोसळण्याची शक्यता कमी आहे, असे हवामान विभागाने म्हटले आहे.


देशात ऑगस्ट महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याशिवाय राज्यात देखील सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. देशात पुढील दोन महिने मान्सून सामान्य राहण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्रात ऑगस्ट ते सप्टेंबर दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मान्सूनमध्ये अल निनोचा प्रभाव वाढत जाण्याचा अंदाज आहे. मात्र दुसरीकडे आयओडी पॉझिटिव्ह राहणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अल निनोचा मान्सून मागील दोन महिन्यात कोणताही प्रभाव नाही, आयओडी न्युट्रल आणि पॉझिटिव्हकडे सरकत असल्याचं मागील दोन महिन्यात चांगला पाऊस आला आहे.


मुंबई, पुण्यासह राज्यात पावसाने थोडीफार उसंत घेतली आहे. पण ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. महाराष्ट्रामध्ये २, ३ आणि ४ ऑगस्ट रोजी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. राज्यात ऑगस्ट महिना कोरडा जाणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. ऑगस्टचा पहिला आठवडा सोडला तर राज्यात पाऊस कोसळण्याची शक्यता कमी आहे, असे हवामान विभागाने म्हटले आहे.


विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. २ ऑगस्ट रोजी विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. ३ ऑगस्ट रोजी कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात अतिमुसळधारेचा अंदाज आहे. दरम्यान, पुढील पाचही दिवस कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पाऊस मात्र तीव्रता कमी राहणार आहे. ४ ऑगस्ट रोजी मराठवाड्यातील छ. संभाजीनगर, जालना आणि परभणीत विजांसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.




Comments
Add Comment

मोठा प्रश्न? कावळेच नाहीत! पितृपक्षात वाडीला शिवणार कोण?

मुंबई : हिंदू धर्मातील पितृपक्ष काळात पूर्वजांना श्राद्ध आणि तर्पण करणे हा पवित्र संस्कार आहे. या काळात घराघरांत

१ कोटी लाडक्या बहिणींना लखपती दीदी बनवणार - मुख्यमंत्री

छत्रपती संभाजीनगर :  प्रत्येक गावात जिल्हा बॅंकेमार्फत लाडक्या बहिणींना बिनव्याजी एक लाख रुपयांचे कर्ज देऊन

कोल्हापुरच्या अंबाबाईचे दर्शन घ्यायला जात असाल तर आधी हे वाचा

कोल्हापुरच्या अंबाबाईचे दर्शन आज दिवसभर राहणार बंद मुंबई: कोल्हापुरातील अंबाबाई मंदिर हे प्रसिद्ध

देशभरात उद्यापासून “स्वस्थ नारी, सशक्त परिवार" अभियानाला सुरूवात

पालघर : केंद्र सरकारतर्फे महिलांच्या आरोग्याची तपासणी, जनजागृती आणि पोषण सेवांचा प्रसार करण्यासाठी “स्वस्थ

नागपुर पोलिसांची ‘ऑपरेशन शक्ती' अंतर्गत मोठी कारवाई, OYO मध्ये चालला होता भलताच प्रकार

ओयो हॉटेलमध्ये सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, तिघांना अटक, एक फरार नागपूर: नागपूर शहर पोलिसांच्या ‘ऑपरेशन शक्ती’

श्री तुळजाभवानी देवी शारदीय नवरात्र महोत्सवाला महाराष्ट्राच्या प्रमुख महोत्सवाचा दर्जा

महोत्सवात स्थानिक लोकपरंपरांचे होणार सादरीकरण मुंबई : श्री तुळजाभवानी देवी शारदीय नवरात्र महोत्सवाला