गुजरात : भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यातील बहुप्रतिक्षित ICC विश्वचषक सामन्याचे वेळापत्रक बदलले आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान सामना १५ ऑक्टोबरच्या मूळ वेळापत्रकाच्या एक दिवस आधी, १४ ऑक्टोबरला करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या मुद्द्यावर अद्याप बीसीसीआय किंवा आयसीसीने कोणतेही अधिकृत वक्तव्य केलेले नाही. परंतु पुनर्नियोजनाची विंडो पाहता, १४ ऑक्टोबर ही कट्टर प्रतिस्पर्ध्यांमधील विश्वचषक स्पर्धेची तारीख निश्चित करण्यात आली आहे. ठिकाणात कोणताही बदल करण्यात आलेला नसून हा सामना नरेंद्र मोदी स्टेडियमलाच (Narendra Modi Stadium) होणार आहे.
गेल्या महिन्यात बीसीसीआयने (BCCI) वनडे वर्ल्डकपचे (World Cup) संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले होते. या वेळापत्रकानुसार भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय व्होल्टेज सामना हा १५ ऑक्टोबर घटस्थापनेदिवशीच होणार होता. मात्र बीसीसीआयला सुरक्षा एजन्सींनी या सामन्याची तारीख बदलावी अशी विनंती केली होती. नवरात्रीचा पहिला दिवस असल्याने गुजरातमध्ये गरबा खेळण्यासाठी प्रचंड गर्दी असते. त्यात भारत आणि पाकिस्तान यांचा सामना झाल्यास सुरक्षा यंत्रणांची तारांबळ उडण्याची शक्यता आहे, अशी ती विनंती होती. बीसीसीआयने देखील या गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेत त्वरित बैठक घेतली होती.
गेल्या आठवड्यात, बीसीसीआयचे सचिव जय शाह म्हणाले की तीन एजन्सींनी आयसीसीला पत्र लिहिल्यानंतर एकदिवसीय विश्वचषकाच्या वेळापत्रकात बदल होण्याची शक्यता आहे. ४-५ दिवसांचे अंतर कमी करण्यासाठी सामन्यांच्या तारखा आणि वेळा बदलल्या जातील मात्र ठिकाणे बदलली जाणार नाहीत, असेही त्यांनी सांगितले. जर खेळांमध्ये सहा दिवसांचे अंतर असेल तर ते ४-५ दिवसांपर्यंत कमी करण्याचा आमचा प्रयत्न आहे. तीन-चार दिवसांत चित्र स्पष्ट होईल. आयसीसीशी सल्लामसलत करून बदल होतील, असे शहा म्हणाले होते.
त्यानुसार हा सामना शक्यतो घटस्थापनेच्या आदल्या दिवशी म्हणजे १४ ऑक्टोबरला खेळवण्यात येण्याची दाट शक्यता आहे. याबाबतची अधिकृत घोषणा बीसीसीआय आज करण्याची शक्यता आहे. या सामन्याबरोबरच अजून काही सामन्यांची देखील तारीख बदलली जाऊ शकते.
भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याची नवीन तारीख स्थानिक प्रशासनाला मदत करू शकते, परंतु १५ ऑक्टोबरच्या वेळापत्रकानुसार आधीच व्यवस्था केलेल्या हजारो क्रिकेट चाहत्यांचा मात्र हिरमोड होऊ शकतो. या थरारक संघर्षाचे साक्षीदार होण्यासाठी चाहत्यांनी अहमदाबादमध्ये हॉटेल्स, अगदी रुग्णालये कशी बुक केली आहेत याबद्दल अनेक अहवाल आले आहेत. परंतु कार्ड्सवरील नवीन तारखेसह, चाहत्यांना १४ ऑक्टोबरच्या वेळापत्रकानुसार बदल करावे लागणार आहेत.
मुंबई : भारतीय क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईत वानखेडे स्टेडियमवर एक धक्कादायक घटना घडली…
मुंबई : बॉलीवूडचा किंग खान म्हणून शाहरुख खानची ओळख आहे. अनेकदा तो आणि त्याचे कुटुंब…
मुंबई : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या शोमधून स्वत:ची ओळख निर्माण करणारा 'फिल्टरपाड्याचा बच्चन' म्हणजेच गौरव मोरे…
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांना विमान कंपनीच्या गैरव्यवस्थापनाचा चांगलाच फटका बसला. अब्दुल्ला…
छत्तीसगड : छत्तीसगडमधील कोरबा जिल्ह्यात आईस्क्रीम कारखान्यात एक धक्कादायक घटना घडली. कारखान्याच्या मालकाने चोरीच्या संशयावरुन…
मुंबई : आपण अनेक चित्रपटांची गाणी ऐकली आणि बघितली असतील. भारतीय चित्रपटात गाणी नसतील तर…