Governor appointed 12 MLAs : राज्यपाल नियुक्त १२ आमदारांप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाचा 'हा' आदेश

जाणून घ्या काय आहे हा आदेश...


मुंबई : राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या नियुक्तीसंबंधी (Governer appointed 12 MLAs) अनेक तर्क-वितर्क लावण्यात आले असले तरी हा प्रश्न अजून सुटलेला नाही. मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) आज एका प्रकरणात सुनावणी करताना या प्रश्नासंबंधी एक महत्त्वाचा आदेश दिला आहे. त्यानुसार या नियुक्तीसंबंधी राज्य सरकारला पुढील १० दिवसांत शपथपत्र सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तत्कालीन मविआ सरकारने शिफारस केलेल्या १२ आमदारांच्या नियुक्तीचा मुद्दा जसा आहे तसाच राहील, असेही कोर्टाने या प्रकरणी नमूद केले आहे.


विधान परिषदेतील राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या नियुक्तीचा तिढा गेल्या ३ वर्षांपासून प्रलंबित आहे. या प्रकरणी सोमवारी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. या प्रकरणी नव्याने दाखल करण्यात आलेल्या एका याचिकेवर सुनावणी करताना हायकोर्टाने राज्य सरकारला आपली भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर सुनावणी २१ ऑगस्टपर्यंत स्थगित केली. यावेळी कोर्टाने राज्य सरकारला पुढील १० दिवसांत आपली बाजू प्रतिज्ञापत्राद्वारे स्पष्ट करण्याचेही निर्देश दिले. तत्पूर्वी झालेल्या सुनावणीत राज्य सरकारच्या महाधिवक्त्यांनी केलेल्या १२ आमदारांच्या शिफारशीच्या मुद्द्यावर सरकारने अद्याप कोणताही निर्णय घेतला नसल्याचे स्पष्ट केले.


१२ आमदारांचा न सुटलेला प्रश्न


कोर्टाने सप्टेंबर २०२२ मध्ये राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नियुक्तीला स्थगिती दिली होती. परंतु ही स्थगिती आता उठवण्यात आली आहे. राज्यात शिंदे - फडणवीस सरकार आल्यानंतर त्यांनी महाविकास आघाडीने दिलेल्या १२ सदस्यांची यादी मागे घेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांनी नवी यादी सादर करण्याची तयारी सुरू केली. त्यानुसार भाजपला १२ पैकी ८, तर शिवसेनेला ४ जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र आता अजित पवार यांच्या सत्तेतील एंट्रीमुळे भाजपला ६ तर शिवसेनेला व अजितदादांच्या राष्ट्रवादीला प्रत्येकी ३ जागा मिळण्याची शक्यता आहे.


Comments
Add Comment

मेट्रो ३ ने दाखवली ‘स्पीड’ची ताकद : पहिल्याच दिवशी ऐतिहासिक प्रतिसाद!

मुंबई : मुंबईकरांनी मेट्रो ३, म्हणजेच अ‍ॅक्वा लाईनला दिलेला प्रतिसाद पाहता हा प्रकल्प खऱ्या अर्थाने यशस्वी ठरत

ई-बस प्रवाशांसाठी एसटीकडून मासिक व त्रैमासिक पास योजना सुरु

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी महामंडळाने) प्रवाशांच्या सोयीसाठी आणि ई-बस सेवेला अधिक

डिजिटल क्रांतीद्वारे भारताची जागतिक महासत्तेकडे वाटचाल

मुंबई : डिजिटल क्रांतीच्या माध्यमातून भारत आत्मनिर्भरतेकडून जागतिक महासत्तेकडे वाटचाल करीत आहे. या

भारत-ब्रिटन भागीदारी जागतिक स्थैर्य आणि आर्थिक प्रगतीसाठी महत्त्वाचा आधार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांचे संयुक्त निवेदन व्यापार, तंत्रज्ञान, शिक्षण

RBI : RBIचा जबर धक्का! 'या' मोठ्या बँकेचा परवाना रद्द, ठेवीदारांना फटका!

सातारा : भारताची मध्यवर्ती बँक असलेल्या भारतीय रिझर्व्ह बँकेने पुन्हा एकदा बँकिंग नियमांचे उल्लंघन करणाऱ्या

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना धक्का! ‘ती’ अट ठरतेय अडचणीची; दिवाळीत पैसे मिळणार की नाही?

मुंबई : महाराष्ट्रातील महिलांसाठी सुरू असलेल्या 'लाडकी बहीण योजने'च्या लाभार्थ्यांसाठी आता एक मोठी अडचण निर्माण