सारथी, बार्टीसह महाज्योतीच्या सर्व योजनांमध्ये सुसूत्रता आणणार

मुंबई : ‘सारथी’ ‘बार्टी’ तसेच ‘महाज्योती’च्या सर्व योजनांमध्ये लवकरच सुसूत्रता आणणार आहोत, अशी माहिती इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी प्रश्नोत्तराच्या तासात विधानपरिषदेत दिली.


‘महाज्योती’ संस्थेने एमएचटी-सीईटी, जेईई व नीटच्या प्रशिक्षणार्थीची संख्या कमी केल्याबाबत सदस्य सुधाकर अडबाले यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना मंत्री सावे बोलत होते.


मंत्री सावे म्हणाले की, महाज्योती संस्थेमार्फत सन २०२२-२३ मध्ये एमएचटी-सीईटी, जेईई व नीटच्या प्रशिक्षणाकरिता ४,९६२ अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी ४,२११ विद्यार्थी प्रशिक्षणासाठी पात्र होते. सन २०२२-२३ मध्ये प्रत्यक्ष लाभ घेतलेल्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेवून सन २०२३-२४ करिता विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ करून ६,५०० करण्यात आली आहे, असे मंत्री सावे यांनी सांगितले. यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य अभिजित वंजारी, भाई जगताप यांनी सहभाग घेतला.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

Andheri Tree Fall : मुंबईत आणखी एक दुर्घटना! अंधेरीत फांदी कोसळून पादचारी गंभीर जखमी

मुंबई : मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसादरम्यान झाड कोसळण्याच्या घटनांमध्ये आणखी एक भर पडली आहे. अंधेरी पूर्व

Chandrashekhar Bawankule : राज्यातील २ लाख आदिवासींना मिळणार 'सातबारा'

- वनपट्टाधारकांसाठी 'नमुना ७ ई आणि १२ ई' लागू; महसूलमंत्र्यांची विधानसभेत ऐतिहासिक घोषणा मुंबई : राज्यातील लाखो

Vasai-Virar Rain Update : वसई-विरारमध्ये पावसाचा कहर! पूर, वीज आणि इंटरनेट बंद; हजारो नागरिकांचे जनजीवन विस्कळीत

पालघर : वसई-विरार (Vasai- Virar) परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. सलग दोन

Pune Rain : मुसळधार पावसाचा फटका! भीमाशंकरचा संपर्क तुटला; दोन्ही प्रमुख मार्ग वाहतुकीसाठी बंद

पुणे : पुणे (Pune) जिल्हा आणि घाटमाथ्यावर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या

Wadala building collapse : वडाळ्यात इमारतीचा पहिला मजला कोसळला; तिघेजण किरकोळ जखमी

मुंबई: मुंबईतील वडाळा (Wadala)(पूर्व) परिसरात मंगळवारी इमारतीचा पहिला मजला कोसळल्याची घटना घडली. शांतीनगर येथील

Kalyan Dombivli rain : खांद्याएवढ्या पाण्यात अडकलेल्या कुटुंबाची पोलिसांकडून सुटका; पडघा पोलिसांच्या धाडसी बचावकार्याचे कौतुक

Kalyan Dombivli rain : कल्याण-डोंबिवली परिसरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भाग जलमय झाले