Lokmanya Tilak Purskar : शरद पवारांनी दिला अरविंद केजरीवालांना धक्का!

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या कार्याचा सन्मान करण्याकरता त्यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार (Lokmanya Tilak Purskar) जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्काराचे वितरण १ ऑगस्ट रोजी पुण्यात होणा-या सोहळ्यात करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला शरद पवार (Sharad Pawar) प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असल्याची माहिती होती. मात्र, राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवारांनी भाजपसोबत संघर्ष करणार असल्याची भूमिका घेतली होती. यावर आता सोहळ्याचे मुख्य आयोजक रोहित टिळक (Rohit Tilak) यांनी भाष्य केलं असून त्यांच्या म्हणण्याप्रमाणे हा कार्यक्रम जसा ठरला आहे तसाच होणार आहे. यात शरद पवार देखील उपस्थित राहणार आहेत, असा दावा त्यांनी केला आहे.


दरम्यान, १ ऑगस्ट रोजी दिल्ली सरकारसंबंधी एक विधेयक राज्यसभेत मांडण्यात येणार आहे. त्यामुळे शरद पवारांनी त्या दिवशी राज्यसभेत उपस्थित राहावं यासाठी आपचे नेते अरविंद केजरीवाल प्रयत्न करणार होते. मात्र शरद पवार या दिवशी पुण्यातच थांबणार असल्याने राज्यसभेत हा केजरीवालांसाठी धक्का मानला जात आहे.



रोहित टिळक म्हणाले...


रोहित टिळकांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटलं की, हा कार्यक्रम ठरलेल्या पद्धतीने होणार आहे. तर शरद पवार हे प्रमुख पाहुणे म्हणून या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत तसेच त्यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार पंतप्रधान मोदी यांनी देण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे. तसेच अजून तरी कोणीही गैरहजर राहण्याबद्दल कळवलं नाही. त्यामुळे या कार्यक्रमाला सर्व मान्यवर उपस्थित राहणार आहेत.



हे राजकीय व्यासपीठ नाही


रोहित टिळक हे काँग्रेसचे नेते आहेत. लोकमान्य टिळक पुरस्कार काँग्रेस पक्षाकडूनच पंतप्रधान मोदींना दिला जाण्याबाबत होत असलेल्या टीकेवर बोलताना रोहित टिळक म्हणाले की, हे राजकीय व्यासपीठ नाही. तसेच यापूर्वी इंदिरा गांधी, अटलबिहारी वाजपेयी, बाळासाहेब देवरस, शरद पवार यांच्यासह अनेक शास्त्रज्ञांनाही हा पुरस्कार दिला गेला आहे. निरनिराळ्या क्षेत्रात काम केलेल्या लोकांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. कॉंग्रेसचे नेते पंतप्रधान मोदींना हा पुरस्कार देण्यास विरोध करत असले तरी हा पुरस्कार राजकारण विरहित आहे. त्यामुळे याचं राजकारण का केलं जातंय हे कळत नाहीये. तसेच आत्मनिर्भर भारत निर्माण करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचा भाग म्हणून त्यांना हा पुरस्कार देण्यात येत असल्याचं रोहित टिळक यांनी म्हटलं आहे.


हा कार्यक्रम सकाळी पार पडणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे पुरस्कार वितरण सोहळा हा सकाळी पार पाडून सर्व नेते मंडळी दिल्लीत हजेरी लावणार असल्याचं देखील म्हटलं जात आहे. त्यामुळे आता या दिवसाचं आयोजन कसं असणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

Maharashtra's Rajya Sabha Seats : महाराष्ट्रातील ७ राज्यसभा जागांची निवडणूक 'बिनविरोध' होणार? शरद पवारांच्या जागेवरही टांगती तलवार

मुंबई : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या दणदणीत विजयाचा फायदा आता महायुतीला राज्यसभेतही मिळणार

चेन्नईमध्ये बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव, H5N1 विषाणूमुळे शेकडो कावळे मृत्युमुखी; सरकारकडून महत्त्वाच्या सूचना जारी

चेन्नई: तामिळनाडूची राजधानी चेन्नईत बर्ड फ्लूचा इशारा देण्यात आला आहे. चेन्नईमध्ये शेकडो कावळे मृत आढळले आहेत.

Days In February : फेब्रुवारी महिन्यात 'इतके' दिवस बँका राहणार बंद! राज्यानुसार यादी जाहीर; पहा संपूर्ण वेळापत्रक

भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) दरवर्षी बँकांच्या सुट्ट्यांची अधिकृत यादी जाहीर करत असते, ज्यामध्ये देशभरातील सार्वजनिक

Pariksha Pe Charcha 2026: 'परीक्षा पे चर्चा'च्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिले विद्यार्थ्यांना 'हे' कानमंत्र

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज म्हणजेच शुक्रवार ६ फेब्रुवारी रोजी 'परीक्षा पे चर्चा' च्या

Meghalaya Coal Mine Blast : मेघालयमध्ये अवैध कोळसा खाणीत भीषण स्फोट, १८ जणांचा बळी, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

शिलाँग : मेघालयातील जयंतिया हिल्स जिल्ह्यातील थांगस्कू परिसरात एका अवैध कोळसा खाणीत झालेल्या भीषण स्फोटाने

UPSC 2026 New Rules: यूपीएससी परीक्षेच्या नियमात महत्वाचे बदल; वाचा संपूर्ण माहिती

केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) ४ फेब्रुवारी रोजी नागरी सेवा परीक्षा (CSE) आणि भारतीय वन सेवा (IFS) परीक्षा २०२६ साठी