मुंबई : राज्यात शिवसेना आणि भाजपचे डबल इंजिनचे सरकार होते. अजितदादा आल्यामुळे आमचे सरकार ट्रिपल इंजिनचे झाले असून या सरकारचे काम जोमात सुरू आहे. आम्ही ‘वर्क फ्रॉम होम’ करणारे नसून रस्त्यावर उतरून काम करणारे आहोत. त्यामुळे काही जणांची अडचण झाली असून त्यांची पोटदुखी सुरू झाली असल्याचा घणाघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी विधानसभेत केला.
आपल्या खास विनोदी शैलीत उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीला धारेवर धरून मुख्यमंत्र्यांनी तुफान फटकेबाजी केली. मुख्यमंत्र्यांच्या या चौफेर फटकेबाजीला सत्ताधारी आमदारांनी बाके वाजवून जोरदार प्रतिसाद दिला. राज्यभरात सध्या सुरू असलेली अतिवृष्टी आणि पुराच्या पाण्यामुळे नागरिकांच्या घरांचे आणि मालमत्तेचे नुकसान झाल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी निवेदन केले. आपत्तीग्रस्तांना वाढीव आर्थिक मदत देण्याची घोषणाही त्यांनी केली. ही वाढीव मदत जून ते ऑक्टोबर, २०२३ या चालू पावसाळ्यातील नैसर्गिक आपत्तीसाठी देण्यात येईल, असे त्यांनी घोषित केले. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, ज्या ठिकाणी अतिवृष्टी, पूर आला, तिथे सरकारने मदतीचा हात दिला आहे. राज्यात कुठेही अडचण येते तेव्हा सरकार खंबीरपणे उभे राहते. इर्शाळवाडी दुर्घटनेनंतर सरकार म्हणून आम्ही तेथे तातडीने पोहोचलो. काही लोक तिथे फक्त दिखावा करण्यासाठी चिखल तुडवत गेले, पण आम्ही दिखावा करण्याचे काम करत नाही. आम्ही ‘वर्क फ्रॉम होम’ करणारे नसून रस्त्यावर उतरून काम करणारे आहोत, अशा शब्दांत शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.
आमचे सरकार शेतकऱ्यांचे सरकार असून चांगले काम करीत आहे. चांगले काम करताना आमच्यावर टीकाही होते, पण या टीकेला आम्ही कामाने उत्तर देणार आहोत, असे ते म्हणाले. ही तोंडाची वाफ नाही, तर आम्ही काम करणारे आहोत. त्यामुळे काही लोकांची अडचण झाली असून त्यांची पोटदुखी वाढली असल्याचा हल्लाबोल मुख्यमंत्र्यांनी केला.
ट्रिपल इंजिन सरकारला केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारचे पाठबळ आहे. वर्षभरात केंद्र सरकारने भरपूर निधी दिल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी मोदी सरकारचे कौतुक केले. आमच्या सरकारमध्ये अजित पवार आले आहेत. यापूर्वी ते पलीकडच्या बाकावर काम करताना त्यांना अडचण येत होती. मात्र, आता सरकारमध्ये आल्यानंतर त्यांच्या कामाचा वेग वाढल्याचे त्यांनी सांगितले. चांगल्या कामांवर टीका करू नका, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना केले.
राज्य सरकारने घेतलेले निर्णय लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘शासन आपल्या दारी’ हा कार्यक्रम आयोजित केला आहे. सर्व सरकारी योजना एका छताखाली आणून लोकापर्यंत पोहोचवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मात्र, या कार्यक्रमावर टीका केली जात आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून १ कोटी १० लाख लाभार्थ्यांनी लाभ घेतला आहे. त्यामुळे या योजनेचे महत्त्व किती आहे, हे आपणही लोकांना समजावून सांगा, ते लोकांपर्यंत पोहोचवा, असे आवाहनही शिंदे यांनी केले.
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…
World Earth Day 2025: आपली शक्ती, आपला ग्रह - विश्व पृथ्वी दिन २०२५ मुंबई :…