Rain Updates : मुंबई-ठाण्याला पावसाने झोडपले!

आज सकाळपर्यंत 'रेड अलर्ट' कायम


मुंबई : मुंबईत मुसळधार पाऊस सुरू असून पुढील दोन दिवस पाऊस असाच सुरू राहण्याची शक्यता आहे. पालघर जिल्ह्यासह वसई-विरार, ठाणे जिल्ह्यातील कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, अंबरनाथ, बदलापूरला देखील पावसाने चांगलेच झोडपले आहे.


मागील काही दिवसांपासून मुंबईसह आसपासच्या परिसरात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस कोसळत आहे. मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचले आहे. तर मुंबईतील सर्व शाळा-महाविद्यालयांना सुट्टी देखील देण्यात आली आहे. जोरदार पावसामुळे लोकल सेवा धिम्या गतीने सुरू आहे. मुंबईतील काही परिसरांमध्ये वाहतूक कोंडी झाली आहे. अशा परिस्थितीत, नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. गरज असेल तरच घराबाहेर पडावे, अशी सूचना नागरिकांना करण्यात आली आहे.


पुढील काही तासांत याठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. पालघर आणि ठाणे जिल्ह्यालाही हवामान खात्याने ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. काही भागात वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.


मुंबईत काल दुपारपर्यंत रेड अलर्ट जारी करण्यात आला होता. पण पावसाचा वाढता जोर पाहून हवामान विभागाने रेड अलर्टचा कालावधी वाढवला आहे. सध्याच्या पावसाचा जोर पाहता आज सकाळी ८:३० वाजेपर्यंत रेड अलर्ट वाढवण्यात आला आहे.


पालघर जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून जोरदार पाऊस सुरू असून रात्रीपासून धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. पालघर जिल्ह्यातील सूर्या प्रकल्पाचे सर्वात मोठी पाणी क्षमता असलेले धामणी धरण भरले असून रात्री दोन वाजता धामणी धरणाचे पाचही दरवाजे पन्नास सेंटीमीटरने उघण्यात आले असून धामणी मधून पाण्याचा विसर्ग सूर्या नदीत करण्यात आला आहे. त्यामुळे सूर्य नदीला मोठा पूर आला असून नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. धामणी धरणातून पालघर जिल्ह्यातील प्रमुख शहरांसह वसई विरार आणि मीरा-भाईंदर महानगरपालिकांना पाणीपुरवठा होतो. तसेच सूर्या प्रकल्पाच्या उजवा आणि डावा कालव्याच्या मार्फत शेतकऱ्यांना शेतीसाठीही पाणीपुरवठा करण्यात येतो.


मुसळधार पावसामुळे उल्हास नदीला पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अंबरनाथ आणि बदलापूर जवळील बारवी धरण देखील धोक्याच्या पातळीपर्यंत भरले आहे, त्यामुळे पाणी धोक्याच्या पातळीपर्यंत पोहोचल्यानंतर धरणाचे स्वयंचलित दरवाजे आपोआप उघडले जातील आणि बारवी नदीत पाण्याचा विसर्ग सुरू होईल.


पालघर जिल्ह्यातील जव्हार भागात मुसळधार पाऊस जव्हार नगरपालिका हद्दीतील जांभूळ विहीर भागातील घरांमध्ये पुराचे पाणी शिरले. अति मुसळधार पावसामुळे या भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.


पालघर जिल्ह्यातील जव्हार, विक्रमगड, डहाणू, तलासरी या तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू असून ठीक ठिकाणी सकल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे तर पुराचे पाणी रस्त्यांवर आल्यामुळे रस्तेही बंद होण्याची पाळी निर्माण झाली आहे. विक्रमगड तालुक्यातील जव्हार कासा रोडवरील तलवाडा येथील मोरीवर पुराचे पाणी आल्यामुळे हा रस्ता सुद्धा बंद झाला आहे. तर सारणी उरसे ऐना या रोडवरील साकवांवर पुराचे पाणी आल्यामुळे जवळपास बारा गावांचा संपर्क तूटला आहे.


हवामान विभागाचे शास्त्रज्ञ अनुपम कश्यपी यांनी दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढली आहे. हे कमी दाबाचे क्षेत्र वायव्य दिशेला सरकत आहे. परिणामी पुढील दोन दिवस राज्यात बहुतेक ठिकाणी मुसळधारेचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

Eknath Shinde : वरळीतील हायप्रोफाईल कॉन्सर्टमध्ये दुर्दैवी मृत्यू! आयोजक चौकशीच्या फेऱ्यात, एकनाथ शिंदेंचा इशारा

मुंबई : मुंबईतील वरळी येथील एनएससीआय डोममध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका हायप्रोफाईल कॉन्सर्टदरम्यान २८

Amit Satam : संकुलातील ५६ खोल्याच्या बेकायदा गैरवापराबाबत चौकशी करण्याचे निर्देश - मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अमीत साटम

मुंबई भाजप अध्यक्ष अमीत साटम, महापौर रितू तावडे, उपमहापौर संजय घाडी, किरीट सोमय्या यांनी केली शहाजीराजे क्रीडा

Tajinder Singh Tiwana : प्रभाग क्रमांक ४७ मध्ये अत्याधुनिक “२४ तास मान्सून डिझास्टर कंट्रोल रूम” सुरू

मुंबई : पाणी साचणे, वाहतूक कोंडी, झाडे कोसळणे तसेच इतर आपत्कालीन परिस्थितींमध्ये नागरिकांना तात्काळ मदत उपलब्ध

Maharashtra : शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी, मान्सून कोकणात पोहोचला तरी...

मुंबई : मान्सून दक्षिण कोकणात दाखल झाला असून सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांतील काही भागांमध्ये 9 जूनपर्यंत

CYBER CRIME : सावधान! व्हॉट्सॲपवरील 'त्या' मेसेजने गंडा; नवी मुंबईतील व्यावसायिकाची १ कोटी ९ लाखांची फसवणूक

NAVI MUMBAI : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या नावाखाली सध्या फसवणुकीचे नवनवीन प्रकार समोर येत आहेत. नवी मुंबईत शेअर बाजारात

Mumbai Crime : मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये संतापजनक प्रकार, तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी एकास अटक

मुंबईतून (Mumbai) एक संतापजनक घटना समोर आली आहे. मुंबई लोकल ट्रेनमधून प्रवास करताना एका तरुणीचा विनयभंग (Molestation)