Wednesday, April 23, 2025
Homeताज्या घडामोडीम्हाडा मुंबई मंडळाच्या सोडतीसाठी इतके अर्जदार अपात्र

म्हाडा मुंबई मंडळाच्या सोडतीसाठी इतके अर्जदार अपात्र

मुंबई ( प्रतिनिधी ): म्हाडा मुंबई मंडळाच्या सोडतीची पात्र अर्जदारांची अंतिम यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये ४ हजार ८२ सदनिकांच्या विक्रीकरिता प्राप्त झालेल्या १ लाख ४५ हजार ८४९ अर्जांपैकी अंतिमतः १ लाख २० हजार १४४ अर्ज संगणकीय सोडतीत सहभागी होणार आहेत.यामाध्यमातून मंडळाकडे अंदाजे ५१९ कोटींचा अनामत रकमेचा भरणा झाला आहे. अपात्र अर्जदारांना अनामत रकमेचा परतावा मंडळातर्फे तातडीने करण्यात येणार आहे.

मुंबई मंडळाच्या सदनिका विक्री सोडतीत सहभाग घेणार्यां पात्र अर्जदारांची सूची म्हाडाच्या housing.mhada.gov.in या संकेतस्थळावर २८ जुलै, २०२३ रोजी दुपारी ३.०० वा प्रसिद्ध करण्यात आली आहे. २२ मे, २०२३ रोजी दुपारी ३.०० वाजेपासून ऑनलाइन अर्ज नोंदणीला सुरुवात झाल्यानंतर मुंबई मंडळाच्या सदनिका विक्री सोडतीला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. ११ जुलै या सोडत प्रक्रियेच्या शेवटच्या दिवसापर्यंत संगणकीय सोडत प्रणालीमध्ये १ लाख ४५ हजार ८४९ अर्ज प्राप्त झाले होते.यापैकी १ लाख २२ हजार ३१९ अर्जदारांनी अनामत रकमेचा भरणा केला होता. अर्जांच्या छाननी प्रक्रियेअंती २ हजार १७५ अर्ज नानाविध कारणांमुळे अपात्र ठरविण्यात आले आहे. याबाबतचा तपशील मंडळातर्फे सकारण म्हाडाच्या संकेत स्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.

मुंबई मंडळातर्फे विक्री करिता जाहीर करण्यात आलेल्या ४०८२ सदनिकांमध्ये प्रधान मंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत १९४७ सदनिकांचा समावेश आहे. प्रधान मंत्री आवास योजना प्रकल्पातील घरे पहाडी गोरेगाव येथे असून या घरांकरिता २२ हजार ४७२ अर्ज प्राप्त झाले आहेत. तसेच उत्पन्न गटनिहाय अत्यल्प उत्पन्न गटातिल ८४३ सदनिकांसाठी २८ हजार ८६२ अर्ज प्राप्त झाले आहेत. आणि या उत्पन्न गटातील सर्वाधिक अर्ज कन्नमवार नगर विक्रोळी (४१५) या योजनेकरिता प्राप्त झाले आहेत. तसेच अल्प उत्पन्न गटातील १०३४ सदनिकांसाठी ६० हजार ५२२ अर्ज प्राप्त झाले असून सर्वाधिक अर्ज पहाडी गोरेगांव(४१६) या योजनेकरिता आहेत. तर मध्यम उत्पन्न गटातील १३८ सदनिकांसाठी ८ हजार ३९५ अर्ज प्राप्त झाले असून सर्वाधिक अर्ज उन्नत नगर गोरेगांव येथील गृहनिर्माण योजनेकरिता आले आहेत आणि उच्च उत्पन्न गटातील १२० सदनिकांसाठी २०६८ अर्ज प्राप्त झाले असून सर्वाधिक अर्ज शिंपोळी कांदीवली पश्चिम येथील गृहनिर्माण योजनेकरिता आहेत. सोडतीचे स्थळ व तारीख मंडळातर्फे लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -