अहमदाबाद: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (UP CM Yogi Adityanath) यांच्या आधारकार्डसोबत छेडछाड करण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. बिहारमधील मुजफ्फरपूर येथे एका तरुणाला या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. आरोपीने मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांच्या जन्मतारखेमध्ये बदल केला होता. तसेच बदल केलेल्या आधारकार्डचा चूकीचा वापर देखील करण्यात आल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, अहमदाबाद येथून सायबर पोलिसांचं पथक बिहारला गेले आणि बिहार पोलिसांसोबत कामगिरी करत अर्पण दुबे याला बेड्या ठोकल्या. अहमदाबाद पोलीस पुढील तपास करत आहेत. आरोपीच्या वडिलांचे म्हणणे आहे की, अर्पण निर्दोष आहे. त्यांच्या मुलाविरुद्ध यापूर्वी कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. तो अभ्यासातही चांगला आहे. दरम्यान, अटक करण्यात आलेला तरुण अर्पण दुबे हा अर्थशास्त्र विषयात पदवीच्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेत आहे. अर्पण याने कॉम्पुटर डिप्लोमाचा कोर्सही केलेला आहे.
मुंबई : मुंबईच्या उत्तर भागातील विस्मृतीत गेलेल्या आणि अतिक्रमणांखाली दबलेल्या ११ तलावांना पुन्हा मोकळा श्वास…
मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांचा 'फॅण्ड्री' (Fandry Movie) हा…
जलतरण शिकतानाच ११ वर्षांच्या मुलाचा बुडून मृत्यू; क्रीडा संकुल व्यवस्थापनावर गुन्हा दाखल भायंदर : उन्हाळी…
व्हॅटिकन सिटी : श्वसनाच्या आजाराने त्रस्त असलेल्या पोप फ्रान्सिस यांचे ८८ व्या वर्षी निधन झाले.…
पुणे : शिवनेरी किल्ल्यावर पुन्हा एकदा पर्यटकांवर मधमाशांनी हल्लाबोल केला आहे. या हल्ल्यात १६ जण…
व्हॅटिकन सिटी : रोमन कॅथलिक चर्चचे २६६ वे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांचे सोमवारी ८८…