नवी दिल्ली : २०२४ मध्ये देशात जेव्हा एनडीएचे (NDA) सरकार येईल त्यावेळी माझ्या (PM Modi) पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात भारतीय अर्थव्यवस्था ही जगातील टॉप तीन (Top 3) मध्ये असेल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी बुधवारी व्यक्त केला. दिल्लीतील प्रगती मैदानावर भारत मंडपम कन्व्हेन्शन सेंटरच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत भाजपच सत्तेत येणार आणि आपणच पंतप्रधान होणार, असा दावाही मोदींनी व्यक्त केला आहे.
यावेळी उपस्थितांना संबोधित करताना मोदी म्हणाले, गेल्या ५ वर्षात देशातील साडेतेरा कोटी लोक गरीबीतून बाहेर आले आहेत. आंतरराष्ट्रीय संस्था असेही म्हणत आहेत की भारतातील गरिबी संपण्याच्या मार्गावर आहे. मागील ९ वर्षात सरकारने घेतलेले निर्णय आणि राबविलेली धोरणे देशाला योग्य दिशेने घेऊन जात असल्याचे यावरून दिसून येत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, “ट्रॅक रेकॉर्डच्या आधारे मी सांगत आहे की, “तिसऱ्या टर्ममध्ये भारताचे नाव जगातील पहिल्या तीन मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये असेल. म्हणजेच माझ्या पंतप्रधानपदाच्या तिसऱ्या टर्ममध्ये भारत पहिल्या तीन अर्थव्यवस्थांमध्ये अभिमानाने उभा राहील. २०२४ मध्ये आमच्या तिसर्या कार्यकाळात देशाचा विकास प्रवास अधिक वेगाने होईल. तुमची स्वप्ने तुमच्या डोळ्यासमोर पूर्ण होताना दिसतील.” पंतप्रधान मोदींच्या या वक्तव्याकडे लोकसभा निवडणुकीतील विजयाचा दावा म्हणून पाहिले जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले की, “आमच्या पहिल्या कार्यकाळाच्या सुरुवातीला भारत जागतिक अर्थव्यवस्थेत दहाव्या क्रमांकावर होता. लोकांनी आमच्या हाती सत्ता दिली त्यावेळी आम्ही दहाव्या क्रमांकावर होतो. दुसऱ्या टर्ममध्ये भारत जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनली आहे. आता आंतरराष्ट्रीय एजन्सी असेही सांगत आहेत की भारतातील गरिबी संपण्याच्या मार्गावर आहे.”
पंतप्रधान मोदी म्हणाले की, “भारत ही लोकशाहीची जननी असल्याचे आता जगाने स्वीकारले आहे. आज आपण स्वातंत्र्याची ७५ वर्षे पूर्ण होत असताना अमृत महोत्सव साजरा करत आहोत, तेव्हा हा भारत मंडपम ही आम्हा भारतीयांनी आपल्या लोकशाहीला दिलेली एक सुंदर भेट आहे.”
पंतप्रधान म्हणाले की, “काही आठवड्यांनंतर येथे जी-२० शी संबंधित कार्यक्रम आयोजित केले जातील. जगातील बड्या देशांचे प्रमुख येथे उपस्थित राहणार आहेत. संपूर्ण जगाला भारताची पुढे पडणारी पावले आणि भारताची वाढती उंची या भारत मंडपममधून दिसेल.”
पंतप्रधान मोदी म्हणाले की, “आजचा दिवस प्रत्येक देशवासियांसाठी ऐतिहासिक आहे. आज कारगिल विजय दिवस. देशाच्या शत्रूंनी दाखवलेल्या कृत्याला भारत मातेच्या सुपुत्रांनी आपल्या शौर्याने पराभूत केले. संपूर्ण देशाच्या वतीने मी कारगिल युद्धात बलिदान दिलेल्या प्रत्येक वीराला श्रद्धांजली अर्पण करतो.”
विरोधकांवर टीका करताना मोदी म्हणाले, काही लोकांची चांगली कामे थांबविण्याची आणि विनाकारण टीका टिप्पणी करण्याची प्रवृत्ती आहे. कर्तव्य पथचे बांधकाम सुरू होते त्यावेळीही त्यावेळी वर्तमानपत्रांच्या पहिल्या पानांवर बातम्या छापल्या जात होते. या मुद्द्यावर ते लोक कोर्टातही गेले होते. पण त्याचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर आता तेच कोर्टात जाणारे लोक त्याला चांगले म्हणत आहेत.
या कन्हेन्शन सेंटरमध्ये ९ ते १० सप्टेंबर दरम्यान १८ वी जी २० बैठक होणार आहे. सरकारी एजन्सी इंडिया ट्रेड प्रमोशन ऑर्गनायजेशन (आयटीपीओ) चे हे संकुल १२३ एकरमध्ये विस्तारलेले आहे. ७ हजार लोकांपेक्षा जास्त लोक एकाच वेळी बसू शकतील इतकी आसन क्षमता आहे. या सेंटरमध्ये तीन हजार आसन क्षमतेचे अॅम्फीथिएटरही आहे. साडेपाच हजारहून अधिक वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था येथे करण्यात आली आहे.
श्रीनगर : सलग तीन दिवस जम्मू काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. लडाख या केंद्राशासित भागात…
नवी दिल्ली : अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स सोमवार २१ एप्रिल रोजी भारताच्या चार दिवसांच्या दौऱ्यावर…
मुंबई(ज्ञानेश सावंत): सध्या गुजरात टायटन्स आयपीएलच्या गुण तक्त्यात अव्वल स्थानावर आहे. गुजरातने या अगोदरच्या सामन्यात…
रत्नागिरी : विश्व मराठी साहित्य संमेलनात दिल्या जाणाऱ्या साहित्यभूषण पुरस्काराची रक्कम या वर्षीपासून १० लाख…
नागपूर: विविध कार्यक्रमांमध्ये तसेच येथील सव्हिल लाईन्स परिसरातील मुख्यमंत्री सचिवालय-हैदराबाद हाऊसमध्ये प्राप्त होणारे जनतेचे अर्ज…
बंद पडलेली टॉय ट्रेन पुन्हा सुरु; मंत्री पीयूष गोयल यांची घोषणा मुंबई (प्रतिनिधी) : संजय…