नागपूर : वीज बिल रोखीने भरणार्या वीज ग्राहकांसाठी महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने (Maharashtra Electricity Regulatory Commission) एक नवा आदेश जारी केला आहे. त्यानुसार आता वीज बिल (Light Bills) रोखीने भरण्याची कमाल मर्यादा पाच हजार असणार आहे, त्यावरील सर्व बिल्स ऑनलाईन पद्धतीने (Online Payment system) भरावी लागणार आहेत. हा नियम सर्व वर्गांना लागू करण्यात येणार असून केवळ लघुदाब कृषी वर्गवारीतील ग्राहकांना ही मर्यादा दहा हजार रुपये असणार आहे. हे निर्बंध १ ऑगस्टपासून लागू करण्यात येणार आहेत.
कुठल्याही वीज ग्राहकाने महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने घालून दिलेल्या मर्यादेपलीकडील वीजबिलांचा भरणा केवळ ‘ऑनलाईन’ पद्धतीनेच करावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. विनामर्यादा वीज देयकाचा भरणा करण्यासाठी ग्राहक ‘ऑनलाईन’ पध्दतीने महावितरणच्या www.mahadiscom.in या संकेतस्थळावरून (Website) तसेच महावितरणच्या मोबाईल ॲपद्वारे केव्हाही व कुठूनही करु शकतो.
‘ऑनलाईन’ पद्धतीस भारतीय रिझर्व्ह बॅंकेच्या पेमेंट व सेटलमेंट कायदा २०७७ च्या (Payment and Settlement Act 2077) तरतुदी असल्याने पाच हजारापेक्षा अधिक रकमेचे वीजबिल रोखीने स्विकारण्यात येऊ नये अशा आशयाच्या सूचना सर्व वीज भरणा केंद्र, जिल्हा सहकारी बॅंकांना, सहकारी संस्था व पतपेढ़ी यांना महावितरणकडून देण्यात येत असून ग्राहकांनी देखील आपले वीजबिल ‘ऑनलाईन’ पद्धतीने भरण्यास प्राधान्य देण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.
‘ऑनलाईन’ वीजबिल भरण्याची पद्धत अत्यंत सुरक्षित आणि फायद्याची असून याद्वारे ग्राहकांना सवलत देखील मिळते. दरमहा ५०० रुपयांच्या मर्यादेत प्रत्येक महिन्याच्या वीजबिलामध्ये ०.२५ टक्के (जास्तीत जास्त ५०० रुपये) तर वीजबिलाचे प्रॉम्प्ट पेमेंट केल्यास १ टक्का असे एकूण १.२५ टक्के सुट वीजग्राहकांना देण्यात येते. ऑनलाईन पध्दतीने भरणा केल्यास ग्राहकास त्वरीत त्याच्या नोंदणीकृत मोबाईल नंबर वर SMS द्वारेपोच मिळते. तसेच www.mahadiscom.in या संकेतस्थळावर व्यवहाराचा इतिहास (Payment History) तपासल्यास भरणा तपशील व पावती उपलब्ध होते.
विशेष म्हणजे क्रेडिट कार्ड (Credit card) वगळता उर्वरीत सर्व पर्यायांद्वारे ऑनलाईन पद्धतीने होणारा वीजबिलाचा भरणा निःशुल्क आहे. या प्रणालीची कार्यपध्दती महावितरणच्या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. तरी, महावितरणने उपलब्ध करुन दिलेल्या या निःशुल्क ऑनलाईन विजबिल भरणा सेवांचा सर्व ग्राहकांनी लाभ घेण्याचे आवाहन महावितरण भांडुप परिमंडलाचे मुख्य अभियंता सुनील काकडे यांनी केले आहे.
प्रा. नंदकुमार काकिर्डे मोदी सरकारने सुरू केलेल्या काही योजना देशातील सर्वसामान्यांपर्यंत चांगल्या रीतीने पोहोचल्या असून…
उमेश कुलकर्णी जागतिक व्यापार संघटनेला ट्रम्प यांच्या टॅरिफ राजवटीने एक मोठा झटका दिला आहे. त्याविरोधात…
डॉ. सर्वेश सुहास सोमण, samrajyainvestments@gmail.com शेअर बाजारात दीर्घकालीन गुंतवणूक ही नेहमीच फायद्याची ठरत आलेली आहे.…
महेश देशपांडे सरत्या आठवड्यामध्ये ऑटो जगताच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या बातम्या समोर आल्या. पहिली म्हणजे ग्रामीण…
- अल्पेश म्हात्रे, मुंबई डॉट कॉम मुंबईची दुसरी लाईफ लाईन असलेल्या बेस्ट उपक्रमाबद्दल गेले महिनाभर…
- सुनील जावडेकर सत्ताकारणाला समाजकारणाची जोड दिली तर एखादा राजकीय नेता त्याच्या आयुष्यात काय चमत्कार…