मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून प्रतिक्षेत असलेला १२ आमदारांच्या नियुक्तीचा प्रश्न अखेर सुटणार आहे. सुप्रीम कोर्टाने स्थगिती हटवल्यानंतर या १२ आमदारांचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती मिळत आहे. पावसाळी अधिवेशनानंतर (Maharashtra Assembly Monsoon Session) राज्यपाल नियुक्त आमदारांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे. यानुसार, महायुतीने सदस्य संख्येचे सूत्र निश्चित केले असून भाजपच्या वाट्याला ६, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या शिवसेनेला ३ आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला ३ जागा मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे.
तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या आघाडी सरकारने नोव्हेंबर २०२१मध्ये १२ राज्यपाल नामनियुक्त सदस्यांची यादी राजभवनाला दिली होती. मात्र, महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात शेवटपर्यंत माजी राज्यपाल भगत सिंह कोशारी यांनी ठाकरे सरकारने दिलेली नावे मंजूर केली नव्हती. उद्धव ठाकरे व शरद पवार यांनी कोशारींवर टीका केल्याने यावरुन राजकारणही रंगले होते. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही यादी रद्द केली. मात्र यादरम्यान हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले होते. आता ११ जुलैला नियुक्तीची स्थगिती सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) उठवल्याने आता राज्यपाल नियुक्त आमदार होण्याचे अनेकांचे स्वप्न पूर्ण होणार आहे.
राज्यपाल नामनियुक्त सदस्य म्हणून विधान परिषदेवर जाण्यासाठी महायुतीत अनेक जण इच्छुक आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचा गट सरकारमध्ये सहभागी होण्याआधी भाजप आणि शिंदे सरकार यांच्यात ८ आणि ४ असे सूत्र निश्चित झाले होते. मात्र अजित पवार यांच्या सहभागानंतर महायुतीच्या तिन्ही पक्षांनी राज्यपाल नामनियुक्तीच्या समान म्हणजे प्रत्येकी ४ जागा घ्याव्यात, अशी चर्चा झाली, परंतु तिन्ही पक्षांच्या नेत्यांच्या बैठकीत विधानसभेतील आमदारांच्या संख्याबळानुसार राज्यपाल नामनियुक्त सदस्यांचे सूत्र निश्चित करण्यात आले. त्यानुसार भाजपच्या कोट्यातून ६, तर शिंदे गट आणि अजितदादा गटाकडून प्रत्येकी ३ नावे दिली जाणार आहेत.
भाजप आणि शिंदे गटात इच्छुकांची संख्या जास्त आहे. भाजपची नावे दिल्लीतून निश्चित होतील, तर शिंदे आणि अजितदादा गटाची नावे अनुक्रमे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून निश्चित केली जातील. त्यानंतर १२ सदस्यांची एकत्रित यादी राजभवनाला पाठवली जाईल. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून राज्यपाल नामनियुक्त सदस्यांच्या १२ नियुक्त्या केल्या जातील. या नियुक्त्यांनंतर विधान परिषदेतील संख्याबळाचे पक्षीय समीकरण बदलणार आहे.
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण नवमी शके १९४७. चंद्र नक्षत्र श्रवण. योग शुभ. चंद्र राशी…
किमतीचे नवे सूत्र समिती ठरवणार मुंबई : स्वत:च्या हक्काचे घर घेण्याचे अनेकांचे स्वप्न असते. मात्र…
पुणे : विद्येचे माहेरघर आणि सांस्कृतिक राजधानी नंतर क्राइम शहर म्हणून ओळखले जाणाऱ्या पुणे शहरात…
मुंबई : उन्हाळ्याचा प्रभाव खुपच वाढत आहे.उन्हाळ्यात बहुतेक लोक शरीर थंड ठेवण्यासाठी दही खातात. पण…
हैदराबाद : दाक्षिणात्य अभिनेता महेश बाबू (Mahesh Babu) यांना रिअल इस्टेट (Real Estate Groups) गुंतवणूकदारांच्या…
वादळ, हिमनद्या वितळणे, अवकाळी पावसासारख्या वाढल्या आपत्तीच्या घटना ठाणे (प्रशांत सिनकर) : जगभरात २२ एप्रिल…