उद्धव ठाकरेंना शाळेत कोणी शिपायाची नोकरी तरी देणार आहे का?

भाजप आमदार नितेश राणे यांचा खोचक सवाल


मुंबई : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्या लायकीवर भाष्य करणार्‍या ठाकरे गटाच्या संजय राऊत (Sanjay Raut) यांना भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी आज विधानभवलात पत्रकारांशी बोलताना खडे बोल सुनावले. यावेळेस, उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) लायकी कोणी काढू नये असं म्हणणार्‍या संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंची बाळासाहेबांशिवाय लायकी काय? असा खडा सवाल विचारला. दरम्यान, नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंवरदेखील मिश्कीलपणे निशाणा साधला.


नितेश राणे म्हणाले, आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे ज्येष्ठ नेते आहेत, मंत्रीही राहिलेले आहेत, त्यांची लायकी काढण्याचं काम आज स्वतः नागडा असलेल्या संजय राजाराम राऊतने केलेलं आहे. त्याच्या म्हणण्याप्रमाणे, उद्धव ठाकरेंची लायकी कोणी काढू नये आणि काढणार्‍या लोकांची पात्रता काय, असा याच्यासारख्या नालायक माणसाने उल्लेख केला. पण उद्धव ठाकरेंच्या नावातून बाळासाहेब ठाकरे जर काढून टाकलं तर उद्धव ठाकरेंना शाळेत कोणी प्युनची किंवा क्लर्कची नोकरी तरी देणार आहे का? असा खोचक सवाल नितेश राणे यांनी उपस्थित केला.


पुढे नितेश राणे म्हणाले, सगळ्या गोष्टी बाळासाहेबांच्या नावाने खपवायच्या, त्यांच्यामुळेच उद्धव हे नाव महाराष्ट्राच्या समोर आहे. स्वतःचं कर्तृत्व मात्र शून्य आहे. मी संजय राऊतला विचारेन की तुझ्या मालकाची आणि तुझ्या मालकाच्या मुलाची बाळासाहेब ठाकरेंशिवाय नेमकी लायकी काय? याचं सर्टिफिकेट दे आणि मग दुसर्‍यांची लायकी काढायची हिंमत ठेव.



आधी याचिका मागे घ्या


मुंबई महानगरपालिकेची निवडणूक कोणामुळे थांबली? कोर्टामध्ये केस कोणी टाकली? याची माहिती कायदा आणि कोर्टाबद्दल कळत असेल, तर उद्धव ठाकरे यांनी द्यावी. माझ्या माहितीनुसार कोर्टामध्ये हस्तक्षेप किंवा ज्या याचिका आहेत, त्यात सर्वाधिक याचिका ठाकरे गटाच्याच आहेत. त्यामुळे तुम्हाला जर निवडणूक पाहिजे असेल तर आधी याचिका मागे घ्या आणि मग मैदानात या, तुमचं वस्त्रहरण करुन तुम्हाला परत मातोश्रीमध्ये कायमस्वरुपी बसवलं, तर आम्ही जनतेसमोर जाणार नाही, असं नितेश राणे म्हणाले.



आदित्य ठाकरेंवर साधला निशाणा


पत्रकारांनी पावसात ठाकरे कुटुंबीय मदतीसाठी ग्राऊंडवर उतरत नाहीत याबद्दल विचारले असता, नितेश राणे मिश्कीलपणे म्हणाले, अशा घाणेरड्या पाण्यामध्ये, जिथे गटाराची दुर्गंधी आहे, तिथे पेंग्विनसारखे साधे प्राणी कसे फिरु शकतात? त्यांना स्वच्छ पाणी लागतं, त्यांना एसी लागतो. म्हणून उगाच कुठल्या बिचार्‍या एका लहान पेंग्विनचा जीव घ्यायला बघू नका, नाहीतर मला तुमची तक्रार करावी लागेल, असं म्हणत नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंवर  (Aditya Thackeray) निशाणा साधला.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांनी केईएम रुग्णालयाला दिले व्हेंटिलेटर दान!

मुंबई: केईएम रुग्णालयाच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त विख्यात गायिका पद्मश्री डॉ. अनुराधा पौडवाल यांनी

Mehli Mistry Exit : टाटा समूहात मोठा भूंकप! नोएल टाटांनी करून दाखवलं; रतन टाटांच्या 'या' जवळच्या व्यक्तीची ट्रस्टमधून हकालपट्टी

मुंबई : उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata) यांच्या निधनानंतर टाटा समूहाच्या महत्त्वाच्या धर्मादाय संस्थांमध्ये (Charitable Trusts)

बोरिवलीत २१ वर्षीय तरुणी ‘अ‍ॅग्रीमेंट रिलेशनशिप’ मध्ये; कुटुंबाची विश्व हिंदू परिषदेकडे धाव

मुंबई : मुंबईतील बोरिवली परिसरात एका २१ वर्षीय तरुणीने लग्न न करता एका मुस्लिम तरुणासोबत ‘लिव्ह-इन रिलेशनशिप

राज्यामध्ये दरदिवशी ६१ बालकांवर अत्याचार

मुंबई : राज्यात बालकांवर होत असलेल्या अत्याचाराच्या गुन्ह्यांचा आलेख चिंताजनक पातळीवर पोहोचला आहे. राष्ट्रीय

दहावी परीक्षेच्या अर्ज भरण्याची मुदतवाढ; जाणून घ्या, आता किती दिवस मिळणार अतिरिक्त संधी

10th SSC Board Exam 2026 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये होणाऱ्या

विरार ते थेट मरीन ड्राइव्हपर्यंतचा प्रवास होणार सिग्नल-फ्री

प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार मुंबई : उत्तन-वसई-विरार सी लिंक प्रकल्पाला अखेर पर्यावरण विभागाने अंतिम मान्यता