PM Kisan : आज शेतकऱ्यांना मिळणार पीएम किसानचा १४वा हप्ता, राजस्थानमधून पंतप्रधानांच्या हस्ते वितरण होणार

Share

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १ हजार ८६६ कोटी रुपयांचा निधी बँक खात्यात थेट हस्तांतरित होणार

पंतप्रधान किसान योजनेंतर्गत राज्यातील ८५.६६ लाख शेतकऱ्यांना मिळणार लाभ

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील ८५.६६ लाख लाभार्थी शेतकऱ्यांना १८६६.४० कोटी रुपयांचा लाभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुरुवारी २७ जुलै २०२३ रोजी देण्यात येणार आहे. हा निधी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM Kisan) योजनेंतर्गत त्यांच्या बँक खात्यात थेट हस्तांतरित केला जाईल.

शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळवून देण्यासाठी, केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजना सुरू केली असून, या योजनेंतर्गत सर्व पात्र शेतकरी कुटुंबांना प्रति हप्ता रु. दोन हजारांच्या तीन समान हप्त्यांसह प्रति वर्ष सहा हजार रुपयांचा लाभ दिला जात आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंतर्गत देय असलेल्या चौदाव्या हप्त्याचा (एप्रिल २०२३ ते जुलै २०२३) लाभ देशातील लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पंतप्रधान मोदी यांच्या शुभ हस्ते वितरित केला जाईल.

खरीप हंगामात बियाणे, खते, औषधे यांसारख्या कृषी निविष्ठा खरेदीसाठी ही रक्कम निश्चितच उपयुक्त ठरेल आणि कृषी उत्पादन वाढीला चालनाही मिळेल. फेब्रुवारी २०१९ मध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू झाल्यापासून, ११०.५३ लाख लाभार्थी शेतकऱ्यांना एकूण रु. २३७३१.८१ कोटी लाभ हस्तांतरित झाला आहे.

महाराष्ट्र राज्यातील एकूण ८५.६६ लाख पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना १ एप्रिल २०२३ ते ३१ जुलै २०२३ या कालावधीसाठी सीकर येथे होणाऱ्या समारंभात अंदाजे रु. १८६६.४ कोटी रुपयांचा लाभ थेट त्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित केला जाईल.

केंद्र सरकारने या योजनेचा लाभ आधारशी जोडलेल्या बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील ८८.९२ लाख लाभार्थ्यांची बँक खाती आधार लिंक्ड लाभांच्या रकमेसाठी नोंदणी करण्यात आली आहेत. उर्वरित सर्व लाभार्थ्यांनी त्यांचे बँक खाते आधारशी लिंक करण्यासाठी संबंधित बँकेला भेट द्यावी आणि केंद्र सरकारच्या विनंतीनुसार पंतप्रधान किसान योजनेचे लाभ मिळविण्यासाठी आधार लिंक करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी बँकेकडे आवश्यक अर्ज सादर करण्याचे सूचित केले आहे. या सोहळ्याला, केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर, केंद्रीय रसायन व खते आणि आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री मनसुख मांडविया उपस्थित राहणार आहेत. परिसरातील शेतकरी कृषी विज्ञान केंद्र (KVK ) येथे https://pmindiaweb- cast.nic.in ही लिंक वापरून या कार्यक्रमात सहभागी होऊ शकणार आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Recent Posts

World Book Day : भूतकाळासह भविष्यकाळातील दुवा म्हणजेच ‘पुस्तकं’

मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…

1 hour ago

‘टीनएजर्सच्या पालकांकडून अपेक्षा’

डाॅ. स्वाती गानू वयाची दहा-बारा वर्षे मुलांशी आपण किती सहज बोलू शकतो, गप्पा मारू शकतो,…

1 hour ago

समाजवादी विचारवंत ना. ग. गोरे

सतीश पाटणकर नारायण गणेश गोरे तथा नानासाहेब गोरे हे समाजवादी विचारवंत तसेच मराठी लेखक आणि…

2 hours ago

राखी वटवट्या

डॉ. महालक्ष्मी वानखेडकर इवलासा चिमणीसारखा अस्थिर जीव जेमतेम दहा-बारा सेंटीमीटरचा. नाकापासून ते पाठीपर्यंत काळ्या रंगाचे…

2 hours ago

“ठाऊक आहे का तूज काही?”

श्रीनिवास बेलसरे चित्रपटसृष्टीतील जुन्या कलाकारांनी, विशेषत: गीतकारांनी, सगळ्या नात्यांना किती सुंदरपणे प्रेक्षकांसमोर आणले ते पाहिले…

2 hours ago

साहित्य म्हणजे नेमकं काय ?

गुरुनाथ तेंडुलकर या प्रश्नाचं बाळबोध उत्तर-काहीतरी साध्य करण्यासाठी लागणारं सामान म्हणजे साहित्य. बागेत फुलझाडं लावायची…

2 hours ago