West indies vs India: विंडिज दौऱ्यात युवा खेळाडूंना का संधी नाही?

  93

सुनील गावस्कर यांचा सवाल


पोर्ट ऑफ स्पेन (वृत्तसंस्था) : वेस्ट इंडिज विरुद्धच्या मालिकेत युवा खेळाडूंपेक्षा मोठ्या नावांना संधी मिळाल्याबद्दल माजी भारतीय क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी नाराजी व्यक्त केली. काही युवा खेळाडूंना आजमावून पाहणे, असे निवड समितीला का वाटत नाही? असा सवाल त्यांनी केला.


गावस्कर म्हणाले की, ‘तरुण खेळाडूंनी मोठ्या खेळाडूंना आव्हान द्यावे, असे निवडकर्त्यांना वाटत नाही का? विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी वेस्ट इंडीजसारख्या दुबळ्या संघाविरुद्ध धावा केल्याचा काय उपयोग? वेस्ट इंडिजचा संघ आगामी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेकरिता पात्र होऊ शकला नाही. अशा संघाविरुद्ध तुम्ही धावा करून निवड समितीला काय सांगू इच्छित आहात? भारताने वेस्ट इंडीजविरुद्ध कसोटी मालिका जिंकली; पण ही मोठी उपलब्धी नाही.


निवड समितीचे नवे अध्यक्ष अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यपद्धतीत बदल होईल का?, अशीही विचारणा करीत ते म्हणाले, ‘विंडीजच्या दुबळ्या आक्रमणाविरुद्ध रोहित आणि कोहलीच्या धावा काही प्रश्न निर्माण करतात. निवडकर्त्यांनी यातून काय शिकले? काही युवा खेळाडूंना आजमावून पाहणे आणि ते कसोटी क्रिकेटमध्ये कशी कामगिरी करतात यावर योग्य तो निर्णय घेणे, असे निवड समितीला का वाटत नाही? असा सवाल गावस्कर यांनी उपस्थित केला.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra
Comments
Add Comment

UAE मध्ये आशिया चषक क्रिकेट स्पर्धा

अबुधाबी : आशिया चषक क्रिकेट स्पर्धा संयुक्त अरब अमिराती अर्थात यूएई येथे होणार असल्याचे वृत्त आहे. आशियाई

Ind vs Eng: भारत वि इंग्लंड दुसऱ्या कसोटीला आजपासून सुरूवात

मुंबई: कर्णधार शुभमन गिलच्या नेतृत्वात भारतीय क्रिकेट संघ इंग्लंड दौऱ्यातील ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेत

Mohammad Shami: कोलकाता उच्च न्यायालयाकडून मोहम्मद शमीला मोठा झटका

नवी दिल्ली: कोलकाता उच्च न्यायालयाकडून क्रिकेटर मोहम्मद शमीला मोठा झटका बसला आहे. उच्च न्यायालयाने शमीला त्याची

Bangalore stampede : 'पोलीस हे काही देव अथवा जादूगार नाहीत', बंगळुरू चेंगराचेंगरीसाठी RCB जबाबदार

बंगळुरू: केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकारणे ४ जूनला बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियममध्ये झालेल्या

बॅडमिंटनपटू आयुष शेट्टीने रचला इतिहास

जिंकले पहिले बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूर विजेतेपद नवी दिल्ली : भारताचा युवा बॅडमिंटनपटू आयुष शेट्टीने यूएस ओपन

'कॅप्टन कूल' या प्रसिद्ध टोपणनावाच्या ट्रेडमार्कसाठी धोनीचा अर्ज

नवी दिल्ली : महेंद्रसिंग धोनीने 'कॅप्टन कूल' या नावासाठी ट्रेडमार्क अर्ज दाखल केला आहे. हे नाव चाहते त्याच्या थंड