मी संकटात असलो की मराठी माणूस, खंजीर, मिंदे गट, खोके.... मुलाखत संपली!

मुंबई : उद्धव ठाकरे यांच्या खासदार संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीची मनसे नेते संदीप देशपांडे यांनी नक्कल केली आहे. यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेत संदीप देशपांडे आणि संजय राऊत यांच्या भूमिकेत संतोष धुरी हे आहेत.


शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी सामना या वृत्तपत्रासाठी उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली होती. आवाज कुणाचा या मथळ्याखाली प्रसिद्ध झालेल्या या मुलाखतीवरून भाजप नेत्यांनी त्यांच्यावर चांगलीच टीका केली. तर या मुलाखतीचा मनसे व्हर्जन बनवत संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरे यांच्या उद्याच्या वाढदिवसासाठी हटके शुभेच्छा दिल्या आहेत.





दरम्यान, "मला घरी बसायला आवडतं, शिवसेनेचा मुख्यमंत्री, मर्दाची औलाद, दिल्लीश्वर, अफजलखानाच्या फौजा, औरंगजेब, मास्क, सुरक्षित अंतर, कपटी, मशाला, कोरोना, गद्दार, मशाल, थोडंथोडं हिंदुत्व, मी संकटात असलो की मराठी माणूस, खंजीर, मिंदे गट, खोके.... मुलाखत संपली" असं बोलत देशपांडे यांनी ठाकरेंची नक्कल केली आहे.

Comments
Add Comment

ठाकरे बंधूंची युती, पण उबाठा आणि मनसैनिकांची दिलजमाई कुठे?

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उबाठा आणि मनसेच्या युतीची जाहीर घोषण

एनबीसीसी आणि मुंबई बंदर प्राधिकरणामध्ये मुंबईतील विकासासाठी सामंजस्य करार

मुंबई : एनबीसीसी (इंडिया) लिमिटेड आणि मुंबई बंदर प्राधिकरण (एमबीपीए) यांनी मुंबई पोर्टच्या जमिनीवर विविध विकास

वायुप्रदूषण नियम उल्लंघनावरून उच्च न्यायालय आक्रमक

पालिका आयुक्त आणि एमपीसीबी सचिवांना प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश मुंबई : फोर्ट, वरळी, बीकेसी, अंधेरी, चकाला आदी

मनसेतून उबाठात गेलेल्यांची उमेदवारी अडचणीत?

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भूमिका निर्णायक ठरणार मुंबई : उबाठा गट आणि मनसेची युती झाल्याने दोन्ही पक्षातील

प्रभादेवीतील प्रभाग १९४ मनसेला सोडण्यास उबाठा गटाचा विरोध

मनसेला सोडल्यास उबाठात बंडखोरी होण्याची शक्यता मुंबई : दोन्ही ठाकरे बंधूंनी युतीची घोषणा केल्यांनतर आता जागा

विरार-अलिबाग प्रकल्पाला येणार गती

हुडकोकडून २२ हजार ५०० कोटींचे कर्ज उपलब्ध मुंबई : विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेच्या प्रकल्पाला आता गती