मुंबई : शहर आणि उपनगरात झोपडपट्टी (SRA) पुनर्वसन योजना (Slum Rehabilitation Authority) हाती घेतलेल्या अनेक विकासकांनी झोपडीधारकांचे पर्यायी वास्तव्याचे भाडे थकविले आहे. या विकासकांवर कारवाई करण्याची मोहीम झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने (एसआरए) हाती घेतली आहे. त्यानुसार भाडे थकबाकीच्या तक्रारी मार्गी लावण्यासाठी प्राधिकरणाने २४ नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे. या अधिकाऱ्यांकडे एसआरए संस्था आणि वैयक्तिक झोपडीधारकाला ३० दिवसांच्या आत माहिती सादर करण्याची संधी प्राधिकरणाने दिली आहे. तसेच प्रकल्प राबविणाऱ्या विकासकांकडून ही भाड्याची माहिती एसआरएने मागविली आहे.
झोपडीधारकांना पक्की घरे देण्यासाठी मुंबई महानगर क्षेत्रात एसआरए योजना राबविण्यात येत आहे. या योजनेनुसार विकासकांनी झोपडपट्टी पुनर्वसनाचे विविध प्रकल्प हाती घेतले आहेत. इमारतीचे बांधकाम करतेवेळी योजनेतील पात्र झोपडीधारकांना विकासकाकडून झोपडीचे निष्कासन केल्यावर भाडे देणे बंधनकारक आहे; परंतु विकासक झोपडपट्टीधारकांना मुदतीत भाडे देत नसल्याने अनेक झोपडीधारक, संस्था एसआरए कार्यालयात दाद मागण्यासाठी येतात. विकासकांकडून भाडे मिळत नसल्याने गोरगरीब झोपडीधारकांची आर्थिक कुचंबणा होते. याचा विचार करून एसआरए प्राधिकरणाने चालू योजनांचा आढावा घेतला असता सुमारे १५० विकासकांनी झोपडीधारकांचे भाडे थकविल्याचे निदर्शनास आले. या विकासकांना नोटीस बजावताच त्यांनी काही वर्षांचे झोपडीधारकांचे पर्यायी वास्तव्याचे भाडे दिले आहे. या कारवाईनंतरही अनेक विकासक भाडे देत नसल्याचे दिसून आल्याने प्राधिकरणाने मुंबई महानगरातील झोपडपट्टी पुनर्वसन योजनांसाठी क्षेत्रनिहाय नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे. या नोडल अधिकाऱ्यांचा दूरध्वनी क्रमांक, ईमेल आयडी, क्षेत्र जाहीर करण्यात आले असून थकबाकी असलेल्या नागरिकांना आपली तक्रार ३० दिवसांच्या आत नोंदवावी लागणार आहे.
नोडल अधिकाऱ्यांना त्यांच्या क्षेत्रातील झोपडपट्टी पुनवर्सन योजनानिहाय भाडे थकबाकी संदर्भातील माहिती झोपडीधारकांना देता येणार आहे.
झोपडपट्टी पुनवर्सन योजनेतील सहकारी संस्था वा वैयक्तिक झोपडीधारक देखील थकीत भाड्या संदर्भात माहिती देऊ शकतील. तसेच भविष्यात देखील भाडे थकबाकी संदर्भात समस्या उद्भवल्यास प्रथम नोडल अधिकाऱ्यांना थकबाकी भाड्याची माहिती देता येणार आहे. अनेक वर्षांपासून भाडे थकलेल्या या कारवाईमुळे दिलासा मिळणार आहे.
भाडे थकीत असलेल्या झोपडीधारकांकडून प्राधिकरणाने माहिती मागविली आहे. त्यासाठी नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. भाडे थकीत असलेल्या झोपडीधारकांना ३० दिवसात तक्रार नोंदवता येणार आहे. झोपडीधारकांचे भाडे न देणाऱ्या विकासकाच्या प्रकल्पाचे काम थांबविणे, विकासक बदलणे अशी कारवाई करण्यात येत आहे. – सतीश लोखंडे, मुख्य कार्यकारी अधिकारी, एसआरए
मुंबई(ज्ञानेश सावंत):सुरवातीच्या सामन्यात चेन्नईने मुंबईला फिरकीच्या जोरावर पराभवाचे पाणी पाजले. परंतु तो सामना चेन्नईच्या घरच्या…
पूजा काळे सृष्टीचे तत्त्व सांभाळा, नेहमीची येतो उन्हाळा. वर्षभरात तीन ऋतूंच्या तीन तऱ्हा सांभाळताना होणारा…
पुणे : काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रात अध्यक्ष बदलला आहे. हर्षवर्धन सपकाळ महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष झाले आहेत.…
डॉ. वीणा सानेकर भाषा हा शिक्षणातील पायाभूत घटक आहे. ती माणसाच्या अस्तित्वाची ओळख असल्यामुळे शिक्षणातील…
अर्चना सोंडे जगात ज्या काही दुर्मीळ आदिवासी जमाती आहेत. ज्यांचे पृथ्वीवरील अस्तित्व संपल्यात जमा झाले…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण सप्तमी शके १९४७. चंद्र नक्षत्र पूर्वाषाढा. योग सिद्ध. चंद्र राशी…