बंगळुरू : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सहकार्यवाहक आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे माजी संघटन मंत्री मदनदास देवी (वय ८१) यांचे आज (सोमवारी) पहाटे बंगळुरू येथे वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांच्या पार्थिवावर उद्या (मंगळवारी) सकाळी अकरा वाजता पुण्यात अंत्यसंस्कार होणार आहेत. जवळपास ७० वर्षे त्यांनी संघाच्या प्रचारासाठी काम केले. संघापासून ते भाजपपर्यंत राजकीय निरीक्षक म्हणूनही ते कार्यरत होते.
प्रकृती अस्वास्थ्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून ते घरीच उपचार घेत होते. वर्षभरापूर्वी त्यांच्यावर हरिद्वारच्या पालमपूरच्या आयुर्वेद संस्थेत पंचकर्म व इतर उपचारही करण्यात आले होते.