पुणे: पुण्यातील घाट विभागात गेल्या काही दिवसांपासून (Pune Weather Update) मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. हवामान खात्याने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, ताम्हिणी घाट परिसरात गेल्या २४ तासात २३० मिमी पावसाची नोंद झाली आहे, तर लोणावळ्यात १३७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. तसेच मावळातील शिरगाव येथे १७० मिमी पाऊस झाला.
पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवडला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीपातळीत वाढ झाली आहे. हवामान खात्याने २३ जुलैला जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट तर २४ ते २६ जुलैपर्यंत यलो अलर्ट जारी केला आहे.
22/7, पुढच्या 5 दिवसात राज्यात 🌧🌧मुसळधार ते मेघगर्जनेसह 🌩🌩पावसांची शक्यता. pic.twitter.com/vbyxXHXgB5
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) July 22, 2023
पुणे घाट भागात जोरदार पाउस सुरु आहे. यामुळे ठिकठिकाणी रस्त्यावर पाणी साचले असल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. कच्च्या रस्त्यांचे नुकसान झाले आहे. अनेक परिसरात भूस्खलन होण्याची शक्यता आहे. या पार्वश्वभुमीवर वाहतूकी संदर्भात जारी केलेल्या रहदारी सूचनांचे पालन करा. घाट भागात जाणे टाळा. वाहने हळू चालवा, असं आवाहन प्रशासनाकडून नागरिकांना करण्यात आलं आहे.