
मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shide) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची सदिच्छा भेट घेतल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी त्यांचे कष्टाळू मुख्यमंत्री म्हणत कौतुक केले आहे.
एकनाथ शिंदे यांनी सहकुटुंब पंतप्रधानांची भेट घेतली. याबाबत मुख्यमंत्र्यांनी ट्वीट करत माहिती दिली आहे. यासोबत पंतप्रधान मोदी यांनी भेटीसाठी वेळ काढल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी त्यांचे आभार मानले. पंतप्रधान मोदी यांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ट्वीट रिट्वीट करत मुख्यमंत्र्यांचा कौतुक केलं आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान मोदी यांच्यासोबतच्या भेटीचे फोटो ट्वीट करत लिहिलं की, ''देशाचे पंतप्रधान म्हणून कणखर आणि सक्षम असलेल्या मा. नरेंद्र मोदीजी यांनी आज माझे वडील, पत्नी, मुलगा खासदार श्रीकांत शिंदे, सून आणि नातू यांच्यासह मला सदिच्छा भेटीला बोलावून आपलेपणाने विचारपूस केली. माझ्या कुटुंबाशी निवांत गप्पा मारल्या. त्यांच्या व्यस्त कार्यक्रमातून आमच्यासाठी वेळ काढला.''
देशाचे पंतप्रधान म्हणून कणखर आणि सक्षम असलेल्या मा. @narendramodi जी यांनी आज माझे वडील, पत्नी, मुलगा खासदार @DrSEShinde, सून आणि नातू यांच्यासह मला सदिच्छा भेटीला बोलावून आपलेपणाने विचारपूस केली. माझ्या कुटुंबाशी निवांत गप्पा मारल्या. त्यांच्या व्यस्त कार्यक्रमातून आमच्यासाठी… https://t.co/2a7lShxhw2
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) July 22, 2023
यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं कौतुक केलं आहे. पंतप्रधान मोदी यांनी ट्वीट करत लिहिलं आहे की, ''महाराष्ट्राचे गतिशील आणि कष्टाळू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी यांना आणि त्यांच्या कुटुंबाला भेटून आनंद झाला. महाराष्ट्राच्या प्रगतीसाठीची त्यांची तळमळ आणि विनम्र स्वभाव कौतुकास्पद आहे.''
महाराष्ट्राचे गतिशील आणि कष्टाळू मुख्यमंत्री @mieknathshinde जी यांना आणि त्यांच्या कुटुंबाला भेटून आनंद झाला. महाराष्ट्राच्या प्रगतीसाठीची त्यांची तळमळ आणि विनम्र स्वभाव कौतुकास्पद आहे. https://t.co/spK6yhZ8Pu
— Narendra Modi (@narendramodi) July 22, 2023