Nitesh Rane : वरुण सरदेसाईच आदित्य ठाकरेला संपवणार!

Share

भाजप आमदार नितेश राणे यांचा दावा

मुंबई : जसे उद्धव ठाकरेंच्या आयुष्यात संजय राजाराम राऊत (Sanjay Raut) शकुनीमामा आहे तसा वरूण सरदेसाई (Varun Sardesai ) हा आदित्य ठाकरेच्या (Aditya Thackeray) आयुष्यात शकुनीमामा आहे. संजय राऊतने उद्धवला संपवले आता वरुण सरदेसाई आदित्य ठाकरेला संपवणार, असा खळबळजनक दावा भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केला आहे.

आज झालेल्या पत्रकार परिषदेत नितेश राणे म्हणाले की, काल रात्री समजले की आदित्य ठाकरेचा अत्यंत निकटवर्तीय, त्याचा लाडका राहुल कणाल उद्या शिवसेनेत प्रवेश करतोय. हा त्याच्यासाठी वैयक्तिक धक्का आहे.

कोविड घोटाळ्यात वरूण सरदेसाईचे नाव

याला सर्वस्वी वरूण सरदेसाई हाच जबाबदार आहे. वरूण सरदेसाईमुळे आदित्य ठाकरेजवळ कोणी उरले नाही. थोडे दिवसातच कोविड घोटाळ्यात वरूण सरदेसाईचे नाव येऊ शकते. त्या घोटाळ्यात वरून सरदेसाई आघाडीवर होता. या सरदेसाईला आवरले नाही तर उद्धव ठाकरेंची जशी अवस्था झाली तशीच अवस्था आदित्य ठाकरेची होईल.

संजय राऊत हा राष्ट्रवादीसाठीच काम करतो, वरूण सरदेसाई भाजपा किंवा शिवसेनेत जाईल

उद्धवला संपवल्यानंतर संजय राऊत हा राष्ट्रवादीसाठीच काम करतो आहे. लवकरच वरूण सरदेसाई देखिल भाजपा किंवा शिवसेनेत जाईल. आदित्य ठाकरे व उद्धव ठाकरे यांना कायम रिटायर करण्याचे काम संजय राऊत व वरुण सरदेसाई करत आहेत, असेही राणे म्हणाले.

आज स्वाभिमानाची वर्षपूर्ती

आज स्वाभिमानाची वर्षपूर्ती आहे. २०१९ ला बाळासाहेबांचे विचार विकून काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत जाऊन सरकार स्थापन झाले होते. पण ५० योध्ये सोबत घेऊन एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेबांच्या विचारांना न्याय दिला. मागील अडीज वर्षात रखडलेली सगळी कामे करून त्यांनी गतिमान सरकार स्थापन केले आहे, असेही राणे यावेळी म्हणाले.

शरद पवार समजणे कठीण

शरद पवार यांच्याबद्दल बोलताना नितेश राणे म्हणाले की, शरद पवार समजायला आम्हाला १०० तर उद्धव ठाकरेंना २०० जन्म घ्यावे लागतील. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचे चॉकलेट देऊन घरी कोणी बसवले? गुगली नेमका कोणाला टाकला आणि सिक्सर कोणाच्या गोलंदाजीवर टाकला?

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Recent Posts

KKR vs GT, IPL 2025: गुजरातविरुद्ध घरच्या मैदानावर कोलकत्त्याचा लाजिरवाणा पराभव

कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…

2 hours ago

उबाठाला राणेंचा दणका! सिंधुदुर्गात होणार १५०० कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश!

२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…

3 hours ago

ही कणकवली नव्हे, कुडाळ आहे! निलेश राणे यांच्याशी पंगा नको!

माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…

3 hours ago

नाल्यातून गाळ काढताना ३० सेकंदाचा व्हिडीओ कंत्राट कंपनीला बंधनकारक

लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…

4 hours ago

PM Modi : आजची धोरणं, उद्याचं भारत! – पंतप्रधान मोदींचा नागरी सेवकांना मंत्र

PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…

4 hours ago