मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या (Brihanmumbai Municipal Corporation) सहाय्यक अभियंत्याला मारहाण आणि धमकी दिल्याप्रकरणी उद्धव ठाकरे गटाचे आमदार अनिल परब (Uddhav Thackeray Group) यांना तूर्तास अटकेपासून दिलासा मिळाला आहे. अनिल परब आणि ६ जणांवर ४ जुलैपर्यंत कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे निर्देश मुंबई सत्र न्यायालयानं (Mumbai Sessions Court) दिले आहेत.
मुंबई पालिकेच्या सहाय्यक अभियंता मारहाण प्रकरणी अनिल परब यांच्यासह अन्य सहाजणांनी अटकपूर्व जामीनासाठी याचिका दाखल केली होती. मंगळवारी मुंबई पोलिसांनी वाकोला पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर तातडीनं हे अर्ज मुंबई सत्र न्यायालयात दाखल केले गेले.
यावर अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. एम. सुंदळे यांच्यासमोर सुनावणी पार पडणं अपेक्षित होतं. मात्र हे कोर्ट शुक्रवारी कामकाजासाठी उपलब्ध नसल्यानं आज विशेष सत्र न्यायाधीश राहुल रोकडे यांच्यासमोर यावर सुनावणी पार पडली. परब यांच्यावतीनं कोर्टात दावा केला गेला की, घटना घडली तेव्हा आपण तिथं हजर होतो. मात्र याचा अर्थ आपण त्यात सामील होतो किंवा आपणही मारहाण केली, असा त्याचा अर्थ होत नाही. याची नोंद घेत तूर्तास कोर्टानं परब यांच्यासह इतरांना मंगळवारपर्यंत अटकेपासूनचा अंतरिम दिलासा दिला आहे. मात्र, यापुढे अनिल परबांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
मागील आठवड्यात वांद्रे येथील ठाकरे गटाच्या अनधिकृत पक्ष कार्यालयावर पालिकेनं निष्कासनाची कारवाई केली होती. त्याच्या निषेधार्थ परब आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी दुपारी पालिकेच्या एच-पूर्व विभाग कार्यालयावर मोर्चा काढला होता. अनिल परब यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ एच-पूर्व प्रभागाच्या अधिकारी स्वप्ना क्षीरसागर यांना भेटण्यासाठी बीएमसीच्या कार्यालयात पोहोचलं. पक्ष कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे फोटो असतानाही आमचं पक्ष कार्यालय उद्ध्वस्त करणारे अधिकारी कोण होते? असं परब आणि त्यांच्यासोबतच्या कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांना विचारलं. तेव्हा काही कर्मचारी पुढे आले असता कार्यकर्त्यांनी बीएमसीचे सहाय्यक अभियंता अजय पाटील (४२) यांच्यावर हल्ला केला आणि त्यांना धमकी दिली, असा पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये उल्लेख आहे.
त्यानंतर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी वाकोला पोलिसांकडे याची रितसर तक्रार दाखल केली. त्याआधारे परब यांच्यासह संतोष कदम, सदा परब, उदय दळवी आणि हाजी अलीम खान यांच्यासह अन्य सहाजणांविरूद्ध पालिका अभियंत्याला मारहाण आणि धमकी दिल्याप्रकरणी मंगळवारी गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे याप्रकरणी अटक टाळण्यासाठी परब यांच्यासह अन्य सहा आरोपींनी अटकपूर्व जामीनासाठी मुंबई सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला आहे.
डॉ. महालक्ष्मी वानखेडकर इवलासा चिमणीसारखा अस्थिर जीव जेमतेम दहा-बारा सेंटीमीटरचा. नाकापासून ते पाठीपर्यंत काळ्या रंगाचे…
श्रीनिवास बेलसरे चित्रपटसृष्टीतील जुन्या कलाकारांनी, विशेषत: गीतकारांनी, सगळ्या नात्यांना किती सुंदरपणे प्रेक्षकांसमोर आणले ते पाहिले…
गुरुनाथ तेंडुलकर या प्रश्नाचं बाळबोध उत्तर-काहीतरी साध्य करण्यासाठी लागणारं सामान म्हणजे साहित्य. बागेत फुलझाडं लावायची…
भालचंद्र ठोंबरे शुरसेन देशात चित्रकेतू नावाचा एक चक्रवर्ती राजा होता. तो अतिशय धार्मिक, सुंदर, सर्वगुणसंपन्न…
अॅड. रिया करंजकर कायदेशीर कामकाज करताना प्रत्येक वेळी स्टॅम्प पेपरची गरज भासते. हे स्टॅम्प पेपर…