Thursday, March 20, 2025
Homeताज्या घडामोडीDelhi Metro: दिल्ली मेट्रोतून मद्य नेण्यास परवानगी! पण....

Delhi Metro: दिल्ली मेट्रोतून मद्य नेण्यास परवानगी! पण….

नवी दिल्ली: दिल्ली मेट्रो प्रशासनाने (Delhi Metro) आज प्रवाशांसाठी आज नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार दिल्ली मेट्रोतून प्रवाशांना मद्याच्या २ सीलबंद बाटल्या (Carry 2 Sealed Bottles Of Alcohol) घेऊन प्रवास करण्याची मुभा आहे. परंतु मेट्रो रेल्वे स्थानकाच्या आवारात मद्यपान करण्यास मनाई करण्यात आली असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन (DMRC) च्या अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, दिल्ली मेट्रोवर पूर्वी विमानतळ एक्सप्रेस लाईन वगळता मद्य वाहतूक करण्यास मनाई होती. आता, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) आणि दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या समितीने नुकतेच नियमांचे पुनरावलोकन केले होते. त्यानंतर नवीन सूचना जारी करण्यात आल्या आहेत.

प्रवाशांना मद्याच्या सीलबंद बाटल्यांसह प्रवास करण्याची मुभा असली तरी मेट्रोच्या परिसरात दारू पिण्यास सक्त मनाई आहे. मेट्रो प्रवाशांनी प्रवास करताना नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी केले. दिल्ली मेट्रोत जर, कोणताही प्रवासी मद्य सेवन करताना, अथवा मद्य सेवनामुळे असभ्य वर्तन करताना आढळल्यास, कायद्यातील संबंधित तरतुदींनुसार योग्य ती कारवाई केली जाणार असल्याचेही दिल्ली मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी म्हटले.

मुंबई मेट्रोचा नियम काय?

दिल्लीतील मेट्रोमधून मद्याच्या दोन सीलबंद बाटल्यांसह प्रवास करण्यीच मुभा प्रवाशांना आहे. मुंबई मेट्रोतून (Mumbai Metro) ही असा प्रवास करता येऊ शकतो, अशी माहिती ‘मुंबई मेट्रो वन’च्या (Mumbai Metro One) सूत्रांनी दिली. मुंबई मेट्रोतूनही मद्याच्या दोन पेक्षा अधिक सीलबंद बाटल्यांसह प्रवास करता येऊ शकतो. दिल्ली मेट्रोप्रमाणेच मुंबई मेट्रो आणि स्टेशन परिसरातही प्रवाशाने मद्य प्राशन केल्यास त्याला कारवाईस सामोरे जावे लागणार असल्याचे मुंबई मेट्रो वनच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -