Samir Choughule's Birthday: समीर चौगुलेसाठी प्राजक्ता माळीची खास पोस्ट, म्हणते,... ही ओळख आयुष्यभर...

मुंबई: महाराष्ट्राची हास्यजत्रा (Maharashtrachi Hasyajatra) शोमधून प्रत्येकाच्या घराघरात पोहोचलेले सुप्रसिद्ध अभिनेता समीर चौघुले आज ५० वा वाढदिवस साजरा करत आहे. (Samir Choughule birthday) त्यानिमित्ताने अभिनेत्री प्राजक्ता माळीने (Prajakta Mali ) त्याच्यासाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे. प्राजक्ता माळीने इन्स्टाग्रामवर समीर चौघुलेंबद्दल एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती महाराष्ट्राची हास्यजत्राचे दिग्दर्शक सचिन गोस्वामी, अभिनेता प्रसाद ओक, समीर चौघुले यांच्यासोबत उभी असल्याचे दिसून आली आहे.


प्राजक्ता माळी हिने लिहिले की, दुग्धशर्करा योग..! आषाढी एकादशीला तूझा ५० वा वाढदिवस आला. खरचं…, सगळ्या जगाला हसवण्यासाठी आलेला तू देवदूतच आहेस. तूझ्यामुळे माझ्या दाद देण्याला ओळख मिळाली. आणि मी “वाह् दादा वाह् fame- प्राजक्ता” झाले. आणि ही ओळख आयूष्यभर राहील, असं वाटतं. तू अतिशय कष्टाळू, नम्र, भाबडा आणि अवलिया कलाकार आहेस; तूला आत्तापर्यंत मिळालेलं यश, प्रेम ही तर फक्त सुरूवात ठरो...आणि इथून पुढे देवाचा आशिर्वाद आणि प्रेक्षकांचं प्रेम तुझ्यावर धुव्वाधार बरसत राहो;  ह्याच तूला ५० व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा!





प्राजक्ता माळीच्या या पोस्टवर तिच्या अनेक चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात कमेंट केल्या आहेत. तर काहींनी समीर चौघुलेला देखील वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. प्राजक्ता माळीची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत येत आहे. एका मुलाखतीमध्ये समीर चौघुलेनं सांगितलं होतं की त्याला अभिनय नाही तर क्रिडा क्षेत्रात करिअर करायचं होतं. तो म्हणाला, ‘मी आधी स्पोर्ट्समन होतो. मी शाळेत असताना खो-खो, कबड्डी टीमचा कॅप्टन होतो.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

Madhuri Dixit : कोण होणार करोडपतीच्या एका सीझनसाठी माधुरी घेणार इतके मानधन...

मुंबई : टेलिव्हिजनवरील सर्वाधिक लोकप्रिय आणि रंजक मनाला जाणारा क्विज शो म्हणजे 'कौन बनेगा करोडपती' नेहमीच

Dilip Kumar : ७८ वर्षांपूर्वी गाजलेलं बॉलिवूडचं देशभक्तीपर गाणं! मोहम्मद रफींचा आवाज, दिलीप कुमार यांच्यामुळे अजरामर झालेला इतिहास

मुंबई : स्वातंत्र्यदिन जवळ आला की देशभक्तीपर गाण्यांनी वातावरण भारून जातं. ‘ऐ मेरे वतन के लोगों’, ‘मेरे देश की

Swara Bhasker News : स्वरा भास्करचा ट्रोलर्सवर जोरदार हल्लाबोल! 'त्या' एका वाक्याने बंद केली नेटकऱ्यांची बोलती

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhaskar) तिच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. फहाद अहमद यांच्याशी

Rakesh Bedi : “भेसळ करणाऱ्यांवर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करा!”; ‘धुरंधर’ फेम राकेश बेदींची संतप्त मागणी, व्हिडिओ व्हायरल

मुंबई : आर्थिक फायद्यासाठी अन्न, पेये आणि मद्यामध्ये भेसळ करून लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली

Ajay Devgan : बाॅलिवूडचा सिंघम 'अजय देवगण' लवरकच झळकणार सूत्रसंचालकाच्या भूमिकेत

मुंबई : बॉलिवूडचा सिंघम म्हणून ओळखला जाणारा अभिनेता 'अजय देवगण' आता सूत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसणार आहे. अजय

Madhuri Dixit : लवकरच...! सोनी मराठी वाहिनीवरील 'कोण होणार करोडपती' चे सूत्रसंचालन करणार अभिनेत्री माधुरी दीक्षित

मुंबई : मराठी मनोरंजनविश्वात एका नव्या पर्वाची सुरुवात होत आहे. सोनी मराठी वाहिनी आणि Sony LIV प्रेक्षकांचा ज्ञानावर