Mumbai Metro: मुंबईकरांची होणार वाहतूक कोंडीतून सुटका!

मेट्रो प्रकल्पांभोवतीचे ३३ हजाराहून अधिक बॅरिकेड्स हटविले


८४ किमी लांबीचा रस्ता वाहतूकीसाठी केला खुला


मुंबई ( प्रतिनिधी): मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) (MMRDA) मान्सून (Monsoon) दरम्यान रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी करून नागरिकांना दिलासा देण्यासाठी महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यानुसार एमएमआर क्षेत्रात निर्माणाधीन मेट्रो प्रकल्पातील (Metro Project) उन्नत मार्गाचे काम झालेल्या ठिकाणचे बॅरिकेड्स काढण्यात आले आहेत. ६ मेट्रो प्रकल्पातील एकुण ३३ हजार ९२२ बॅरिकेडस काढल्याने दुतर्फा ८४.८०६ किलो मीटर लांबीचा रस्ता वाहतुकीसाठी मोकळा झाला आहे. रस्त्याच्या दुतर्फा प्रत्येकी १-१ मार्गिका वाहतूकीसाठी उपलब्ध झाली असल्याने मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होण्यास मदत होणार आहे.


मुंबई महानगर प्रदेशात सुमारे ३३७ किमी लांब मेट्रोचे जाळे प्राधिकरणामार्फत उभारण्यात येत आहे. त्यापैकी मेट्रो मार्ग २ब, ४, ४अ, ५,६, ७अ आणि ९ या मेट्रो मार्गांच्या कामासाठी नागरीकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने एका विशिष्ट रुंदीचा भाग बॅरीकेड्स (धातुच्या पत्र्याचे अडथळे) लावून प्रतिबंधित केला जातो. प्रकल्प पुर्ण होईपर्यंत रस्ता अडविण्यात येत असल्याने अनेकदा नागरीकांना मोठ्यावाहतुक कोंडीला सामोरे जावे लागते. त्यावर उपाय म्हणुन प्राधिकरणाने उन्नत मार्गाचे काम झालेल्या ठिकाणचे बॅरिकेड्स काढण्याचा निर्णय घेतला आहे. तसचे बॅरिकेड्स ठेवणे अपरिहार्य असलेल्या ठिकाणी रस्त्याची कमीत कमी जागा व्यापतील अशा पद्धतीने लावण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला आहे. यामुळे मेट्रो प्रकल्पांजवळील सुमारे ८ किमीहून लांबीचा अधिक रुंद रस्ता उपलब्ध झाला आहे. एकुण ३३५२ बॅरिकेड्स अशा पद्धतीने कमी कमी जागा व्यापतील असे पुनर्रचना करण्यात आले. आहेत. तर ६ मेट्रो प्रकल्पातील एकुण ३३ हजार ९२२ बॅरिकेडस काढल्याने दुतर्फा ८४.८०६ किलो मीटर लांबीचा रस्ता वाहतुकीसाठी मोकळा झाला आहे. यामुळे एकूण बॅरिकेड्स पैकी सुमारे ६० टक्के बॅरिकेड्स हटवण्यात आले आहेत.


एमएमआरडीए आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी याबाबत देशाची आर्थिक राजधानी मुंबईत मोठ्या प्रमाणावर विकासकामे सुरु आहेत. मुंबई मेट्रो प्रकल्पातील ज्या ज्या टप्प्यातील कामे झाली आहेत, अशा ठिकाणचे अडथळे काढुन तो रस्ता मुंबईकरांसाठी खुला करण्यात आला आहे.अवघ्या महिन्याभरात प्राधिकरण्याच्या कर्मचाऱ्यानी ३० हजाराहून अधिक बॅरिकेड्स काढले आहेत. दर १५ दिवसांनी मेट्रोच्या कामाचा आणि बॅरिकेड्सचा आढावा घेतला जाईल.आणि एखाद्या ठिकाणी काम संपले की लगेचच तो रस्ता वाहतुकीसाठी खुला करुन दिला जाईल. तसेच रस्त्यांलगतचे सर्व बॅरिकेड्स कमीत कमी जागेत लावून जास्तीत जास्त रस्ता रहदारी साठी मोकळा ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत.

या ठिकाणचे हटवले बॅरिकेड्स


मेट्रो मार्ग २ब

गुलमोहर रोड (जुहू सर्कल ते मिठीबाई महाविद्यालय)
एस.व्ही. रोड (विले पार्ले जंक्शन ते मिलन सबवे)
बी.के.सी रोड (कलानगर ते एमटीएनएल)
वि.एन. पूर्व मार्ग (डायमंड गार्डन ते बीएआरसी फ्लायओव्हर)
सायन- पनवेल हायवे (बीएआरसी फ्लायओव्हर ते मानखुर्द फ्लायओव्हर)



मेट्रो मार्ग ४आणि ४अ

९० फिट रोड
एल.बी. एस मार्ग (वेगवेगळ्या तीन ठिकाणचे १५ किमी बॅरिकेट काढले)
ईस्टर्न एक्स्प्रेस हायवे
घोडबंदर रोड (वेगवेगळ्या दोन ठिकाणी)
डेपो रोड
मेट्रो मार्ग ५
कापूरबावडी ते बाळकुम नाका
बाळकुम नाका ते अंजूरफाटा
अंजूरफाटा ते धामणकर नाका


मेट्रो मार्ग ६


जेव्हीएलआर (पश्चिम द्रुतगती महामार्ग जंक्शन ते महाकाली लेणी)
जेव्हीएलआर (महाकाली लेणी ते पवई तलाव)
जेव्हीएलआर (पवई तलाव- विक्रोळी - पूर्व द्रुतगती महामार्गा वर कांजूर मार्ग डेपो)
मेट्रो मार्ग ९
ओवारीपाडा जंक्शन ते दहिसर टोल
दहिसर टोल ते डेल्टा



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra
Comments
Add Comment

‘टपाली मतपत्रिकांच्या पेट्या मतमोजणीच्या दिवशीच गोदामातून बाहेर काढणार’

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ अंतर्गत, निवडणूक निर्णय अधिकारी - २१ (प्रभाग क्रमांक

मतदानाची वेळ संपली, आतापर्यंत झाले किती टक्के मतदान ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांसाठी मतदान करण्याची वेळ

शाई पुसून पुन्हा मतदान करणे शक्य नाही!

राज्य निवडणूक आयुक्तांचे स्पष्टीकरण; मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न मुंबई : महापालिका

Ashish Shelar : मेंदूत केमिकल लोचा अन् हातावर...'रडके' म्हणत आशिष शेलारांनी ठाकरे बंधूना काढला चिमटा

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज उत्साहात मतदान पार पडत असतानाच, शाईच्या

मतदानानंतर बोटावर शाई का लावली जाते? हात किंवा बोट नसल्यास काय असते नियम?

मुंबई : राज्यातील अनेक महापालिकांमध्ये आज मतदान प्रक्रिया सुरू असून नागरिक उत्साहाने आपला मतदानाचा हक्क बजावत

'मशिदीवर पुन्हा भोंगे लावण्याचे उबाठाचे वचन'

मुंबई :मशिदीवरील भोंगे पुन्हा लावण्याचे वचन देत उद्धव ठाकरेंनी निवडणूक प्रचार केला, असा गंभीर आरोप मुख्यमंत्री