MP Rahul Shewale : दणका! उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांना बदनामीकारक मजकूर प्रकाशित केल्याप्रकरणी शिवडी कोर्टाचे समन्स

१४ जुलैला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश


मुंबई : मुंबईतील शिवडी न्यायदंडाधिकारी (shivdi magistrate court) न्यायालयाने शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना समन्स बजावत १४ जुलै रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. शिवसेना (शिंदे गट) खासदार राहुल शेवाळे (MP Rahul Shewale) यांच्याविरोधात 'सामना' या राजकीय मुखपत्रातून बदनामीकारक खोटी बातमी केल्याप्रकरणी शेवाळेंनी दाखल केलेल्या मानहानीच्या अर्जावर न्यायालयाने हे समन्स जारी केले आहेत.


सामना या मुखपत्राच्या हिंदी आणि मराठी आवृत्तीमध्ये २९ डिसेंबर २०२२ रोजी प्रकाशित एका लेखात राहुल शेवाळे यांचे दुबई तसेच पाकिस्तानातील कराचीत रिअल इस्टेटमध्ये हितसंबंध असल्याचा दावा करण्यात आला होता. यावर शेवाळे यांनी वकील चित्रा साळुंखे यांच्या मार्फत ३ जानेवारी २०२३ रोजी नोटीस पाठवून या लेखातील दाव्यांचा स्त्रोत काय? अशी विचारणा केली होती. त्यावर, एका महिलेने इंटरनेटवर केलेला दावा आणि अन्य माहितीच्या आधारावर हा लेख लिहील्याचे सामनाकडून प्रत्युत्तरात सांगण्यात आले होते.


या उत्तरानंतर शेवाळेंनी दंडाधिकारी न्यायालयात फौजदारी मानहानीची तक्रार दाखल केली आणि मुंबई उच्च न्यायालयात १०० कोटी रुपयांचा मानहानीचा दावाही दाखल केला आहे.


दंडाधिकारी न्यायालयाने ट्रॉम्बे पोलिसांना फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम २०२ अंतर्गत तपास करण्याचे आदेश दिले आहेत. तर दुसरीकडे, पोलिसांनी शेवाळेंना बोलावून त्यांचा जबाबही नोंदवला आहे. 'सामना'मध्ये प्रसिद्ध झालेला मूळ लेख हा पुरावा म्हणून शेवाळे यांनी सादर केला आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

Mumbai Crime : शिक्षकाच्या फोटोचा सोशल मीडियावर गैरवापर, मुंबईच्या महापौरांशी जोडलं नाव; गुन्हा दाखल

मुंबई : मुंबईच्या महापौर ऋतू तावडे (Ritu Tawde) यांचे पती असल्याचा खोटा दावा करत एका फोटोग्राफी शिक्षकाची बदनामी करणारा

Free ST Travel : आनंदाची बातमी! गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांना मोफत एसटी प्रवास; जाणून घ्या कोणत्या मार्गांवर धावणार विशेष बस?

मुंबई : गणेशोत्सवासाठी मुंबई आणि उपनगरातून आपल्या गावी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे.

BMC : फेरीवाल्यांचा माल पकडून नेण्याच्या वाहनांवरच होतोय महापालिकेचा १२ ते १३ कोटींचा खर्च

उपयोग शून्यच! मुंबई (सचिन धानजी): मुंबईत अनधिकृत व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी

Kurla Nehru Nagar Flood Prevention : कुर्ला पूर्व नेहरु नगरमधील तुंबणारे पाणी रोखण्यासाठी ७ कोटींचा बांध

- मिनी पंपिंग स्टेशनची उभारणीसह पुर प्रतिबंधक गेटचे बांधकाम मुंबई (विशेष प्रतिनिधी) कुर्ला (पुर्व) येथील नेहरु

Raosaheb Patwardhan Garden Development : वांद्रे पश्चिम येथील रावसाहेब पटवर्धन गार्डनचा होणार विकास

- तब्बल पाच कोटींचा केला जाणार खर्च मुंबई (विशेष प्रतिनिधी) वांद्रे पश्चिम येथील राबसाहेब पटवर्धन उद्यानाचा आता

Maharashtra Weather Alert : ऑगस्टअखेर पावसाची उघडीप; विदर्भात मात्र पावसाचा जोर, कोकणासह राज्यात हवामानाचा ‘असा’ अंदाज

मुंबई : ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस महाराष्ट्रातील अनेक भागांत पावसाने काहीशी उघडीप घेतली आहे. मात्र विदर्भातील