मुंबई : मुंबईतील शिवडी न्यायदंडाधिकारी (shivdi magistrate court) न्यायालयाने शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना समन्स बजावत १४ जुलै रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. शिवसेना (शिंदे गट) खासदार राहुल शेवाळे (MP Rahul Shewale) यांच्याविरोधात ‘सामना’ या राजकीय मुखपत्रातून बदनामीकारक खोटी बातमी केल्याप्रकरणी शेवाळेंनी दाखल केलेल्या मानहानीच्या अर्जावर न्यायालयाने हे समन्स जारी केले आहेत.
सामना या मुखपत्राच्या हिंदी आणि मराठी आवृत्तीमध्ये २९ डिसेंबर २०२२ रोजी प्रकाशित एका लेखात राहुल शेवाळे यांचे दुबई तसेच पाकिस्तानातील कराचीत रिअल इस्टेटमध्ये हितसंबंध असल्याचा दावा करण्यात आला होता. यावर शेवाळे यांनी वकील चित्रा साळुंखे यांच्या मार्फत ३ जानेवारी २०२३ रोजी नोटीस पाठवून या लेखातील दाव्यांचा स्त्रोत काय? अशी विचारणा केली होती. त्यावर, एका महिलेने इंटरनेटवर केलेला दावा आणि अन्य माहितीच्या आधारावर हा लेख लिहील्याचे सामनाकडून प्रत्युत्तरात सांगण्यात आले होते.
या उत्तरानंतर शेवाळेंनी दंडाधिकारी न्यायालयात फौजदारी मानहानीची तक्रार दाखल केली आणि मुंबई उच्च न्यायालयात १०० कोटी रुपयांचा मानहानीचा दावाही दाखल केला आहे.
दंडाधिकारी न्यायालयाने ट्रॉम्बे पोलिसांना फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम २०२ अंतर्गत तपास करण्याचे आदेश दिले आहेत. तर दुसरीकडे, पोलिसांनी शेवाळेंना बोलावून त्यांचा जबाबही नोंदवला आहे. ‘सामना’मध्ये प्रसिद्ध झालेला मूळ लेख हा पुरावा म्हणून शेवाळे यांनी सादर केला आहे.
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण नवमी शके १९४७. चंद्र नक्षत्र श्रवण. योग शुभ. चंद्र राशी…
किमतीचे नवे सूत्र समिती ठरवणार मुंबई : स्वत:च्या हक्काचे घर घेण्याचे अनेकांचे स्वप्न असते. मात्र…
पुणे : विद्येचे माहेरघर आणि सांस्कृतिक राजधानी नंतर क्राइम शहर म्हणून ओळखले जाणाऱ्या पुणे शहरात…
मुंबई : उन्हाळ्याचा प्रभाव खुपच वाढत आहे.उन्हाळ्यात बहुतेक लोक शरीर थंड ठेवण्यासाठी दही खातात. पण…
हैदराबाद : दाक्षिणात्य अभिनेता महेश बाबू (Mahesh Babu) यांना रिअल इस्टेट (Real Estate Groups) गुंतवणूकदारांच्या…
वादळ, हिमनद्या वितळणे, अवकाळी पावसासारख्या वाढल्या आपत्तीच्या घटना ठाणे (प्रशांत सिनकर) : जगभरात २२ एप्रिल…