welcome board : पंढरपुरात राजकीय नेत्यांचे नव्हे, तर वारकऱ्यांच्या स्वागताचे फलक लावा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन


मुंबई : पंढरपुरात विविध राजकीय नेत्यांच्या स्वागताचे फलक आणि बॅनर्स लावण्यापेक्षा विठ्ठल रखुमाईच्या दर्शनासाठी येणाऱ्या वारकऱ्यांचे स्वागत करणारे फलक (welcome board) लावा, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी  केले आहे.


मुख्यमंत्र्यांनी नुकतेच पंढरपूर येथे जाऊन आषाढी एकादशीनिमित्त वारकऱ्यांसाठी केलेल्या व्यवस्थेचा प्रत्यक्ष आढावा  घेतला. तसेच वारकऱ्यांशी संवादही साधला. यावेळी त्यांच्या लक्षात आले की पंढरपुरात मोठ्या प्रमाणावर विविध पक्षांनी त्यांच्या राजकीय नेत्यांचे स्वागताचे बॅनर्स आणि पोस्टर्स लावले आहेत. पंढरपूरला राज्यातील विविध भागातून लाखो वारकरी येतात. विठ्ठल रखुमाई हे त्यांचे श्रद्धास्थान आहे, अशावेळी राजकीय पक्षांचे बॅनर्स लावण्यापेक्षा मजल दरमजल विठूनामाचा गजर करत येणाऱ्या वारकऱ्यांचे स्वागत करणारे फलक लावले पाहिजेत, असे मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला सुचवले. यावेळी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांनादेखील आवश्यक त्या सूचना केल्या.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

कुंभमेळ्यासाठी नाशिक महापालिकेत अभियंत्यांसह विविध ३०० जागा…

नाशिक  : वाढती लोकसंख्या आणि कमी होणारे मनुष्यबळ यांना तोंड देणाऱ्या नाशिक महापालिकेत स्थापत्य, यांत्रिकी,

स्थानिक निवडणुकांत मनसेपासून काँग्रेस एक हात लांबच राहणार

महाराष्ट्रात उत्तर भारतीय, अल्पसंख्याक नागरिकांना लक्ष्य मुंबई : स्थानिक निवडणुकांमध्ये ठाकरे बंधू एकत्र

जे काही निर्माण करू शकत नाहीत, तेच तोडफोडीची भाषा बोलणार

खासदार श्रीकांत शिंदेंचा पहिल्यांदाच राज ठाकरेंवर वार बुलढाणा  : राज्यातील गडकिल्ल्यांवरील नमो केंद्रावरून

बंजारा समाजाच्या आरक्षणासाठी आयोग स्थापन करणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती, कर्नाटकमधील बंजारा समाजाला दिलासा मुंबई : हैद्राबाद गॅझेटनुसार

निवडणूक प्रमुख आणि जिल्हा निवडणूक प्रभारी यांची यादी जाहीर; स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपने रणशिंग फुंकले!

सिंधुदुर्गच्या प्रभारीपदी मंत्री नितेश राणे तर निवडणूक प्रमुखपदी प्रमोद जठार यांची निवड मुंबई : राज्यातील

आता दुर्गम भागांतही इंटरनेट सेवा पोहोचेल

मुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रख्यात स्टारलिंक कंपनीशी माहिती तंत्रज्ञान विभागाचा सामंजस्य