केवळ खिचडी खाऊन धोनीने २०११ चा विश्वचषक खेळला : सेहवाग

दिल्ली (वृत्तसंस्था) : केवळ खिचडी खाऊन महेंद्रसिंह धोनीने (Mahendrasingh Dhoni) २०११ चा विश्वचषक (World Cup 2011) खेळला असल्याचा खुलासा भारताचा माजी धडाकेबाज फलंदाज वीरेंद्र सेहवागने केला. एकदिवसीय वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर एका इंग्रजी क्रीडा वाहिनीशी सेहवाग बोलत होता.


सेहवाग म्हणाला की, प्रत्येकाच्या मनात काही ना काही विश्वास होता आणि प्रत्येकजण आपापल्या विश्वासाचे पालन करत होता. धोनीला संपूर्ण विश्वचषकादरम्यान 'खिचडी' खाण्यावर विश्वास होता. तो म्हणायचा की मी धावा करत नसलो तरी ही युक्ती काम करत आहे आणि म्हणूनच आपण सामने जिंकत आहोत. त्यामुळे २०११ मध्ये भारताने विश्वचषचक उंचावला.


आयसीसीने भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकाचे मंगळवारी वेळापत्रक जाहीर केले. यावेळी भारतीय संघाचा माजी खेळाडू वीरेंद्र सेहवाग एक एक्सपर्ट म्हणून आपल्या कारकिर्दीतील आठवणींना उजाळा देण्यासाठी स्टुडिओमध्ये उपस्थित होता.

Comments
Add Comment

टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत बुमराहची १० स्थानांची झेप

मुंबई : टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने १० स्थानांची झेप घेतली आहे.

खेळाडूंच्या सुरक्षेसाठी प्रेक्षकांनाच सामना पाहण्यास बंदी!

विराट कोहली १५ वर्षांनी विजय हजारे ट्रॉफी खेळणार नवी दिल्ली : येत्या २४ डिसेंबरपासून देशातील सर्वात मोठ्या

बीसीसीआयच्या निर्णयामुळे महिला क्रिकेट खेळाडूही होणार मालामाल

देशांतर्गत क्रिकेटपटूंच्या मॅच फीमध्ये दुप्पट वाढ मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महिला

मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्सकडे दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची धुरा

मुंबई : मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्स हीने भारतीय संघाला आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०२५ ट्रॉफी जिंकून देण्यात प्रमुख

श्रीलंकेविरुद्धच्या टी ट्वेंटी मालिकेत भारताचा सलग दुसरा विजय

विशाखापट्टणम : भारत आणि श्रीलंका यांच्यात पाच सामन्यांची टी ट्वेंटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील सलग दोन सामने

बुधवारपासून रंगणार विजय हजारे ट्रॉफीचा थरार; बीसीसीआयच्या नियमामुळे स्टार क्रिकेटपटूही मैदानात

मुंबई : विजय हजारे क्रिकेट स्पर्धेचा थरार उद्या म्हणजेच बुधवार २४ डिसेंबरपासून सुरू होत आहे. देशांतर्गत