Joining Shivsena : ठाकरे गटाची गळती कायम; 'हा' नेता शिवसेनेत सामील

'उठा तुमच्यावर लवकरच झोपायची वेळ येणार' नरेश म्हस्के यांनी केलं होतं सूचक ट्विट


मुंबई : वर्षभरापूर्वी महाराष्ट्राचे सद्यकालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेत बंड केल्यामुळे शिवसेनेत उभी फूट पडली. मात्र त्या दिवसापासून ते आजतागायत एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत ठाकरे गटाकडून पक्षप्रवेश होत आहेत. शिवसेना सोडून पुन्हा ठाकरे गटात मात्र कोणीही गेलेले नाही. यातच आता आणखी एक नेता ठाकरे गटातून शिवसेनेत पक्षप्रवेश करणार आहे. या गोष्टीमुळे ठाकरे गटाच्या चिंतेत भर पडली असून पक्षाला लागलेली गळती कायम असल्याचे चित्र आहे.


याबाबत शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी आज सकाळीच एक सूचक ट्विट केलं होतं. आज 'उबाठा'चा आणखी एक मोहरा कमी होईल असं म्हणत त्यांनी 'उठा तुमच्यावर लवकरच झोपायची वेळ येणार' असा सूचक इशारा उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) दिला होता. खरा कार्यकर्ता हा कधीही ठाकरे गटासोबत राहू शकत नाही, अशा अशायाची एक कविता नरेश मस्के यांनी ट्विट केली होती. मात्र या नेत्याचं नाव गुलदस्त्यात होतं. आता हे नाव समोर आलं असून पक्षप्रवेश देखील पार पडल्याने हा ठाकरे गटासाठीचा मोठा धक्का आहे.





संजय अगलदरे (Sanjay Agaldare) असं शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचं नाव आहे. आज वर्षा या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी त्यांचा पक्षप्रवेश पार पडला. ठाकरे गटाचे अनिल परब यांच्या ते जवळचे आहेत. संजय अगलदरे हे तीन वेळा नगरसेवक राहिले आहेत. एकदा वरळी तर दोन वेळा खार दांडा येथून ते नगरसेवक झाले आहेत.


संजय अगलदरे यांनी पक्षप्रवेश केल्यानंतर आपलं बाळासाहेबांचं हिंदुत्वाचं सरकार स्थापन झाल्यानंतर थांबलेली विकासकामे सुरू झाली आहेत, असे शिंदे-फडणवीस सरकारबद्दल गौरवोद्गार काढले. आपलं सरकार आलं आणि चांगल्या सेवा मिळाव्या यासाठी अनेक गोष्टी केल्या असंही त्यांनी म्हंटलं.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

‘केबीसी’मधील वागण्यावर इशित भट्टने मागितली माफी: ट्रोलिंगनंतर व्यक्त केला पश्चाताप

मुंबई : 'कौन बनेगा करोडपती' (KBC) या लोकप्रिय गेम शोमध्ये सहभागी झालेला १० वर्षांचा इशित भट्ट सध्या सोशल मीडियावर

दिवाळी रॉकेटमुळे बोरिवलीत मोठी आग; दुकाने जळून लाखोंचे नुकसान

मुंबई: कफ परेडमधील मच्छिमार नगर येथे सोमवारी पहाटे एका चाळीमध्ये लागलेल्या आगीत १५ वर्षांच्या मुलाचा दुर्दैवी

'राज ठाकरेंनी थेट मोहल्ल्यांमध्ये जाऊन मतदार याद्या तपासाव्यात'

'लोकसभेनंतर 'मत चोरीचे' आरोप का झाले नाहीत?' - मंत्री नितेश राणे यांचा राज ठाकरेंना बोचरा सवाल मुंबई: भाजपचे मंत्री

महापालिकेच्या मालमत्ता कराची ऑक्टोबर पहिल्या पंधरवड्यापर्यंत एवढी झाली वसूली, अधिकारी लागले कामाला...

मुंबई (सचिन धानजी): मुंबई महानगरपालिकेच्या महसुलाचा महत्त्वाचा स्रोत असलेल्या मालमत्ता कराची वसूली १७ ऑक्टोबर

तलाव भरले, तरीही मुंबईत पाण्याची का समस्या, जाणून घ्या कारण!

मुंबई (सचिन धानजी): मुंबईला पाणी पुरवठा करणारे सर्व तलाव आणि धरणे काठोकाठ भरल्यानंतरही पुढील १५ दिवसांमध्येच

आता पावसाळ्यात मध्य रेल्वेच्या रुळावर पाणी साचणार नाही! भुयारी टाकी बसवण्याचा मुंबई पालिकेचा नवा प्रकल्प

मुंबई: पावसाळ्यात दरवर्षी मुंबईत अनेक सखल भागांमध्ये पाणी भरते. तसेच अती पाऊस पडल्यावर मुंबईतील रेल्वेच्या