नवी दिल्ली : हल्ली विजेच्या वाढत्या वापरासोबतच निष्काळजीपणा देखील वाढला आहे. पंखा, एसी, लाईट वापर नसताना बंद करायचं हे लोकं अगदी सहज विसरतात. परिणामी विजेचे बिलही (Electricity Bill) जास्त येते व विजेचा अपव्ययही होतो. या गोष्टी टाळण्यासाठीच केंद्र सरकारकडून (Central Government) वीज वापरकर्त्यांसाठी नवा नियम लागू करण्यात येणार आहे. या नियमामुळे लोकांना वीज वापराचं व्यवस्थापन करता यावं, असा हेतू आहे. या नियमाविषयी आधिक जाणून घेऊयात.
केंद्र सरकार विचार करत असलेल्या नवीन नियमानुसार वीज उपभोक्त्यांना दिवसा आणि रात्रीसाठी वेगवेगळं बिल आकारण्यात येईल. याअंतर्गत ग्राहकांसाठी दिवसा आणि रात्रीचा वेगळा वीज दर आकारणारा नवीन टाइम ऑफ डे (TOD) वीज टॅरिफ लागू केला जाईल. केंद्र सरकार लवकरच वीज ग्राहकांचे हक्क नियम २०२० (Electricity Consumer Rights Rules 2020) मध्ये सुधारणा करणार आहे.
या नवीन दर धोरणाची अंमलबजावणी झाल्यानंतर ग्राहकांना दिवसा आणि रात्रीसाठी वेगवेगळं वीज बिल द्यावं लागेल. दिवसा सौर उर्जेवर वीज पुरवठा केला जाईल, यामुळे दिवसा वीज दर कमी असेल. त्यामुळे दिवसा वीज बिलात ग्राहकांची २० टक्के बचत होऊ शकते. पण रात्री वीज बिल १० ते २० टक्क्यांनी महागणार आहे. याचं कारण म्हणजे रात्रीच्या वेळेत कोळशावर तयार झालेला वीजपुरवठा करण्यात येईल जो तुलनेने महाग असतो.
एकीकडे कोळशावर आधारित थर्मल पॉवर प्लांट्समधून उत्पादित होणारी वीज महाग होत आहे, तर दुसरीकडे हरित ऊर्जेचा प्रचार करून ग्राहकांना सौरऊर्जेचा जास्तीत जास्त वापर करण्यासाठी प्रवृत्त करावे, यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. आता घेतलेल्या निर्णयामुळे २४ तास एकाच दराने वीज बिल भरण्याऐवजी ग्राहक दिवसातील वेगवेगळ्या वेळेनुसार वेगवेगळी वीजबिल भरतील. अशा प्रकारे ते त्यांचा वीज वापराचं व्यवस्थापन करू शकतात.
याबरोबरच रात्रीच्या वेळेत कोळशावर तयार झालेला वीजपुरवठा करण्यात येईल त्यामुळे दर जास्त असेल. रात्रीच्या वेळी जास्त वीज वापरल्यास, एसी आणि इतर इलेक्ट्रिक उपकरणे वापरल्यास सामान्यपेक्षा जास्त वीज मोजावी लागेल. कारण पीक अवर्समध्ये (Peak Hours) टॅरिफ १०-२० टक्के जास्त असेल. यामुळे कोळशावर आधारित वीजनिर्मिती केंद्रांपासून बनवलेल्या विजेची मागणी कमी होईल. सौर तासांमधील वीज नियोजन करून ग्राहक बिलांमध्ये 20 टक्क्यांपर्यंत बचत करू शकतात.
मुंबई : लव रंजन आणि अंकुर गर्ग यांच्या लव फिल्म्सने ‘देवमाणूस’मधून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले…
बंगळुरू : कर्नाटकचे माजी पोलीस महासंचालक अर्थात माजी डीजीपी ओम प्रकाश यांची राहत्या घरातच हत्या…
मुंबई : कोणे एके काळी राष्ट्रपती पुरस्कार विजेता ठरलेला पोलीस अधिकारी आता जन्मठेपेची शिक्षा भोगणार…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण अष्टमी, शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तराषाढा, योग साध्व. चंद्र राशी…
मुंबई : उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागली आहे. कडक सूर्यप्रकाशात घराबाहेर पडणे त्रासदायक वाटू लागले आहे.…
मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने ३४ क्रिकेटपटूंसोबतच्या कराराची घोषणा केली आहे. रोहित…